अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नासाठी डॉ. आदित्य पतकराव २६ नोव्हेंबरच्या बैठकीत घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गाला गती देण्यासह परळी–अंबाजोगाई–मुरुड किंवा परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा– बार्शी या दोन पर्यायी रेल्वे मार्गांचा प्रस्ताव मांडणार
अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नासाठी डॉ. आदित्य पतकराव २६ नोव्हेंबरच्या बैठकीत घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गाला गती देण्यासह परळी–अंबाजोगाई–मुरुड किंवा परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–
बार्शी या दोन पर्यायी रेल्वे मार्गांचा प्रस्ताव मांडणार

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहराला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आदित्य दगडू पतकराव यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या रेल्वेच्या बैठकीत ते अंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्याचा अधिकृत प्रस्ताव मांडणार आहेत.
यासाठी २०१६ मध्ये मंजूर झालेल्या घाटनांदूर–श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षण प्रकल्पाला पुन्हा गती देण्याची मागणी सह
हा मार्ग व्यवहार्य ठरत नसल्यास दोन पर्यायी मार्गांचा विचार करण्याची मागणीही ते रेल्वे प्रशासनाकडे करणार आसुन या पर्यायी मार्गा साठी खा. बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांची अवश्यकता आहे.
*दोन पर्यायी रेल्वे मार्गांचा प्रस्ताव*
अंबाजोगाईला रेल्वेने जोडण्यासाठी
डॉ. आदित्य पतकराव २६ नोव्हेंबरच्या बैठकीत घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गाला गती देण्यासह पुढील दोन पर्याय मांडण्यात येणार आहेत.
१. परळी वैजनाथ–अंबाजोगाई–मुरुड (MRX).
२. परळी वैजनाथ–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा– बार्शी.
हे दोन्ही मार्ग तुलनेने कमी खर्चात विकसित करता येऊ शकतात, अशी भूमिका डॉ. पतकराव यांनी मांडली आहे. विशेष म्हणजे, दुसरा पर्यायी मार्ग बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाथरा येथील साखर कारखान्याजवळून जात असल्याने त्यांनीही या मागणीसाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
*रेल्वे मंत्र्यांकडेही यापूर्वी पाठपुरावा*
अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नासाठी डॉ. पतकराव यांनी यापूर्वी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची भेट घेऊन नवीन रेल्वे स्टेशनची मागणी केली होती. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
*२६ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक*
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून डॉ. पतकराव यांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. समिती सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवीन रेल्वे स्टेशनसंदर्भातील प्रस्ताव मांडण्याची संधी असल्याने या बैठकीत अंबाजोगाईचा प्रश्न अधिकृतपणे मांडला जाणार आहे.
रेल्वे जोडणीमुळे विकासाला चालना
अंबाजोगाई हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक आणि व्यापारी केंद्र आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, योगेश्वरी मंदिर आणि विविध शैक्षणिक संस्थांमुळे येथे राज्यभरातून नागरिक येतात. मात्र, थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
अंबाजोगाई रेल्वेने जोडले गेल्यास शिक्षण, आरोग्य, व्यापार, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते.
काय म्हणाले डॉ. आदित्य पतकराव?
“अंबाजोगाईला रेल्वे स्टेशन मिळणे ही केवळ एका शहराची मागणी नसून संपूर्ण परिसराच्या विकासाची गरज आहे. परळी–बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या पार्श्वभूमीवर घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गात अडचणी येत असतील, तर परळी–अंबाजोगाई–मुरुड किंवा परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–बा र्शी या पर्यायी मार्गांचा विचार व्हावा. हे मार्ग तुलनेने कमी खर्चात शक्य आहेत का, याची तांत्रिक तपासणी रेल्वे प्रशासनाने करावी. खासदार बजरंग सोनवणे यांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. अंबाजोगाईला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असे डॉ. पतकराव यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाईच्या रेल्वे मागणीला आता अधिकृत प्रस्ताव आणि मंत्रालयीन पाठपुराव्याची जोड मिळत आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरच्या बैठकीत रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे अंबाजोगाईसह संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*खा. बजरंग सोनवणे यांची भूमिका महत्वाची*
अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नासाठी रेल्वे बोर्डाच्या सल्लगार समितीचे सदस्य डॉ. आदित्य पतकराव हे सातत्याने प्रयत्न करत असताना आणि २६ नोव्हेंबरच्या बैठकीत घाटनांदूर–श्रीगोंदा मार्गाला गती देण्यासह परळी–अंबाजोगाई–मुरुड किंवा परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा–
बार्शी या दोन पर्यायी रेल्वे मार्गांचा प्रस्ताव मांडणार असल्याने आता या रेल्वे मार्गा साठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.
डॉ आदित्य पतकराव हे मांडत असलेला परळी–अंबाजोगाई–कळंब–येरमाळा– बार्शी हा रेल्वे मार्ग खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीच्या पाथरा येथील येडेश्वरी साखर कारखान्या जवळून जाऊ शकतो त्यामुळे सोनवणे यांनी या मार्गा साठी तरी प्राधान्य क्रमाने प्रयत्न केल्यास निश्चित हा मार्ग पूर्णतःवास आल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
Views: 303


