Wednesday, August 19, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

सय्यद अब्दुल हन्नान हिलालुद्दीन यांना पीएच.डी.; स्वातंत्र्यदिनी सत्कार

सय्यद अब्दुल हन्नान हिलालुद्दीन यांना पीएच.डी.; स्वातंत्र्यदिनी सत्कार

अंबाजोगाई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उर्दूचे संशोधक सय्यद अब्दुल हन्नान हिलालुद्दीन यांच्या ‘शाह हुसेन नहरी : व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या काव्याचा अभ्यास’ या विषयावरील पीएच.डी. प्रबंधाचा ऑनलाइन ओपन डिफेन्स व्हायवा 10 ऑगस्ट रोजी यशस्वीपणे पार पडला.
व्हायवाचे अध्यक्षस्थान डॉ. आय. जे. तांबोळी यांनी भूषविले. बाह्य परीक्षक डॉ. मोहम्मद तैय्यब अली यांनी संशोधनाच्या विविध पैलूंवर प्रश्न विचारले. हिलालुद्दीन यांनी समाधानकारक उत्तरे दिली. प्रा. डॉ. एम. ए. चौबदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
प्रबंधात शाह हुसेन नहरी यांचे व्यक्तिमत्त्व, जीवन, साहित्यिक योगदान तसेच गझल, रुबाई आदी काव्यप्रकारांचा संशोधनात्मक व समीक्षात्मक अभ्यास करण्यात आला आहे.
या यशानंतर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त नॅशनल मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हिलालुद्दीन यांचा सत्कार करण्यात आला. सचिव अब्दुल रहीम आणि अध्यक्ष कमरुद्दीन फारुकी यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. मोहम्मद इक्बाल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अंबाजोगाईचे मुख्याध्यापक अब्दुस्सलाम मुजाहिद तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले. हिलालुद्दीन हे या संस्थेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अध्यापनासोबत उर्दू भाषा व साहित्याच्या क्षेत्रात संशोधनाची वाटचाल सुरू ठेवली आहे. महाराष्ट्र SET (उर्दू) परीक्षेतही त्यांनी यश मिळविले आहे.
त्यांच्या पीएच.डी.च्या यशाबद्दल शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!