Skip to content
घरफोडीचा गुन्हा उघड; ₹40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एक आरोपी अटक

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत चोरीस गेलेला ₹40 हजारांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून एक आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी शैलेश पद्माकर स्वामी (रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ₹14 हजार किमतीचे चांदीचे दागिने व ₹26 हजारांची रोख रक्कम असा एकूण ₹40 हजारांचा ऐवज लंपास केला होता.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी समयुद्दीन जकीयोद्दीन शेख (रा. बिलाल नगर, अंबाजोगाई) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात रियाज इक्बाल पठाण (रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) याचा सहभागही निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहे.
Post Views: 283
error: Content is protected !!