अंबाजोगाई शहर पोलीसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई
अंबाजोगाई शहर पोलीसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

अंबाजोगाई : शहरातील वाहतूक कोंडी व नियमभंग रोखण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलीसांनी विशेष मोहीम राबवत ५० वाहनांवर कारवाई केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या उपस्थितीत तथागत चौक व बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंग करणारी ३० वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रमेश घुले, रमेश सानप, भागवत कांदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरातील विविध भागांत अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. तसेच नागरिकांनी वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करून वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी केले.


