ताज्या घडामोडी

*आ नमिता ताई मुंदडा व सा. बां विभाग अंबाजोगाईच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि यश कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे यांच्या मुळे शहराच्या सौंदर्यात पडू लागली भर*

*आ नमिता ताई मुंदडा व सा. बां विभाग अंबाजोगाईच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि यश कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे यांच्या मुळे शहराच्या सौंदर्यात पडू लागली भर*

*माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारांच्या स्वप्नातील स्वाराती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा मास्टर प्लॅन राहिला अधूरा*

अंबाजोगाई ( दत्तात्रय आंबेकर )
    केज विधानसभा मतदारसंघाच्या  आमदार नमिता ताई मुंदडा व सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथील अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि यश कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे यांच्या मुळे अंबाजोगाई शहरातील सर्व रस्ते चकाचक बनताना आणि शासकीय इमारतीही मोठ्या डौलाने उभारू लागल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडताना दिसते आहे मात्र ही विकास कामे होतं असतानाच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारांचे स्वप्नातील स्वाराती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा मास्टर प्लॅन अधूरा राहिल्याची खंत मात्र मनोमन सलते आहे 
      केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा या अंबाजोगाई शहर विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपयांच्या विकास निधी कशा पद्धतीने खेचून आणता येईल यासाठी प्रयत्नशील असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी हे आपल्या दूरदृष्टीने आंबेजोगाई शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशा पद्धतीने शासकीय कामे कशा पद्धतीने राबवता येतील यासाठी नियोजनबद्ध आखणी करत असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उप अभियंता गोविंद मुंडे व मेडिकल परिसर बांधकाम विभागाचे उप अभियंता गोविंद शेळके व त्यांची टीम हा विकास निधी योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहेत.
     आज अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौक याठिकाण पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक त्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक हा रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरुण कुमार वैद्य चौक मार्गे यशवंतराव चव्हाण चौक या डांबरी रस्त्याचे काम दुभाजकासह अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूने एकाच वेळी दोन वाहने जातील अशा पद्धतीने बनवण्यात येत असलेला हा रस्ता अंबाजोगाई शहराच्या सौंदर्यात भर टाकताना दिसतो आहे.
    लातूर व बीड, धाराशिव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण चौक आणि मेडिकल परिसर, धारूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अरुण कुमार वैद्य चौक हा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कल्पकतेमुळे अतिशय देखणा व भव्य दिव्य बनल्या जात असून याच धरतीवर संत भगवान बाबा चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दोन्ही चौक या परिसरातील अतिक्रमणे काढून भव्य दिव्य व सुशोभित करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मानस दिसून येतो आहे.
       या सर्व विकासकामात व रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी अंबाजोगाई शहरातील सुजाण नागरिकांच्या सहकार्याची ही तेवढीच आवश्यकता असून या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतल्यास खऱ्या अर्थाने अंबाजोगाईच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
*शासकीय इमारती ही अंबाजोगाईच्या सौंदर्यात टाकू लागल्या भर*
    आमदार नमिता ताई मुंदडा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची  विकासाची दूरदृष्टी आणि यश कन्स्ट्रक्शनची भव्य यंत्रणा यामुळे अंबाजोगाई शहरातील केवळ रस्तेच सुशोभित होत आहेत असे नव्हे तर यापूर्वी बनवल्या गेलेल्या अपर पोलीस अधीक्षक अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती शिवाय नुकत्याच बनवण्यात आलेल्या  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत असो की उप निबंधक कार्यालयाची इमारत असो या इमारती शहराच्या सौंदर्यात भर टाकताना दिसत आहेत.
      केवळ याच इमारती आंबेजोगाईच्या सौंदर्यात भर टाकत आहेत असे नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आंबेजोगाई चे  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय विकासाचे एक मॉडेल बनल्या जाणार होते व याच संकल्पनेतून या परिसरात यापूर्वीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुक्रे, भास्करराव खैरे व विद्यमान अधिष्ठाता शंकर धपाटे यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बनवल्या जात असलेल्या भव्य आणि गगनचुंबी इमारतींची गोष्ट तर फारच औरच म्हणावी लागेल.
*मुंदडा परिवारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व यश कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे योगदान  अंबेजोगाई शहरासाठी मौलाच*  

   अंबा नगरीचे नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा, केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता ताई मुंदडा व अक्षय मुंदडा ही मंडळी आंबेजोगाईच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच हा निधी योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी उपअभियंता गोविंद मुंडे, मेडिकल परिसरचे उपाभियंता व त्यांची टीम सातत्याने प्रयत्नशील असून शहराच्या विकासासाठी यश कन्स्ट्रक्शन कंपनी व त्यांचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे यांचे योगदान मोलाचे ठरताना दिसून येत आहे.
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारांच्या  स्वप्नातील स्वाराती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा मास्टर प्लॅन राहिला अधूरा
   माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दोन ते तीन वेळा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन हे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी व  विकासाचे एक मॉडेल बनवण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागात देण्यात आल्या होत्या व त्या अनुषंगाने तसा मास्टर प्लॅनही बनवण्यात आला असून या मास्टर प्लॅन नुसार या रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काही विकास कामे पूर्ण झाले असून काही सुरूही आहेत. याच मास्टर प्लॅनमध्ये एक भव्य दिव्य 12 मजली गगन चुंबी इमारतही बनवण्याचा आराखडा असून स्वर्गीय अजितदादांच्या दुःखद निधनाने दादांच्या स्वप्नातील मास्टर प्लॅन पूर्ण होतो की अधुरा राहतो हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!