Skip to content
पेशवा प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त महिला बँक कर्मचाऱ्यांचा सन्मान

अंबाजोगाई :(प्रतिनिधी)
स्त्री म्हणजे देवीचे रूप असून कोणत्याही क्षेत्रात सर्वोकृष्ट योगदान देण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे प्रतिपादन शरयू हेबाळकर यांनी व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दीनदयाल नागरी सहकारी बँकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान संचालिका सौ. शरयू हेबाळकर आणि उद्योजिका सौ. अलका देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अनिता औटी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर सौ. कल्याणी कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमात बँकेतील,गोस्वामी प्रतिभा अनंतराव ,टाक सुप्रिया पांडुरंग .डाके सुजाता बाळासाहेब ,कंगळे समीक्षा मनोज ,पांडे अल्का संतोष,कुलकर्णी करुणा कल्याणराव ,शिंदे रुपाली अंकुशराव,राठोड छाया पंडीतराव ,पोटलावार कविता कृष्णा या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा कुलकर्णी यांनी केले. तर सौ. प्रणिता पोखरीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी पेशवा प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या प्रतीक्षा जोशी, राजश्री पिंपळे,ज्योत्स्ना लाटकर, स्मिता भातलवंडे , रेणुका भालेराव,राजश्री देशमुख, मनिषा उपळाईकर, उमा देशमुख, ऋतुजा कोंडपल्ले, रोहिणी मुडेगावकर, सई पिंपळकर यांनी पुढाकार घेतला…
Post Views: 101
error: Content is protected !!