Skip to content
*योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न *

अंबाजोगाई:- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक या विभागामध्ये दिनांक ६ मार्च व ७ मार्च २०२६ रोजी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) अंतर्गत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) संलग्न संस्थांमधील पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय चेस व कॅरम या क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक तसेच पॉलीटेक्निक विभागाचे प्रभारी प्रसिद्ध उद्योजक मा. प्रताप पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रताप पवार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना, विविध क्रीडा प्रकारांचे अभियांत्रिकी शिक्षणात महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी केले.
त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धांसाठी उपस्थित असणारे विविध महाविद्यालयांचे क्रीडा प्रमुख यांना देखील सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगणक तसेच क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. अतुल फड यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ. संकेत तोरंबेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांची मंचावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 37
error: Content is protected !!