शिवजयंती निमित्त दुर्गप्रेमी मित्र मंडळाची शिवकालीन वेशभूषा स्पर्धा; 45 स्पर्धकांचा उत्स्फुर्त सहभाग
शिवजयंती निमित्त दुर्गप्रेमी मित्र मंडळाची शिवकालीन वेशभूषा स्पर्धा; 45 स्पर्धकांचा उत्स्फुर्त सहभाग

अंबाजोगाई: (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गप्रेमी मित्र मंडळाने अंबाजोगाई शहरात शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत रंगतदार ठरला.
दुर्गप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी सोने सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संजय गंभीरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राध्यापक डॉ. सौ. उषा माने, डॉ. महेश अकोलकर, मराठवाडा प्रबोधन मंचचे संस्थापक अध्यक्ष सेवकरामजी जाधव, नगरसेवक एडवोकेट किरण भालेकर, माजी नगरसेवक मिलिंद बाबजे, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आंबेकर, बालाजी शेरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत एकुण 45 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेची विविध गटानुसार पारितोषिके जाहीर करण्यात आली.

आरंभ गट:
उत्तेजनार्थ पारितोषिक: प्रगती दत्ता बोडके
तृतीय क्रमांक: वेदिका महादेव कोळपे
द्वितीय क्रमांक: श्रावणी हनुमंत चौधरी
प्रथम क्रमांक: पवित्रा महेश साबळे
मध्यम गट:
उत्तेजनार्थ पारितोषक: समर्थ सूर्यकांत देशपांडे
तृतीय क्रमांक: इलाक्षी सचिन जाधव
द्वितीय क्रमांक: सई योगेश कुलकर्णी
प्रथम क्रमांक: अवनी श्रीकांत पवार
सुबोध गट:
द्वितीय क्रमांक: सौ पल्लवी श्रीकांत पवार
प्रथम क्रमांक: राजकुमारी राजकुमार किर्दंत
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. आनंद कांबळे, प्रा. अमोल अरगडे आणि श्रीमती अंजली चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना अनेक पारितोषिके वितरण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड. बळीराम पुरी, भागवत आचार्य सर, कृष्णा मुदगुलकर, वैभव कुलकर्णी, सौ आरती कुलकर्णी, सौ देशमुख मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सूत्रसंचालन स्वप्निल यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
शिवजयंतीच्या या खास वेशभूषा स्पर्धेने शहरातील संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव केला.
Views: 570


