पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करण्याची कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांची राज्यसभेत मागणी मराठी पत्रकार परिषदेची मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख यांनी मांडले डांगी यांचे आभार
पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करण्याची कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांची राज्यसभेत मागणी

मराठी पत्रकार परिषदेची मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख यांनी मांडले डांगी यांचे आभार
मुंबई ( प्रतिनिधी )
पत्रकारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रवास सवलतीचा मुद्दा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांनी आज शून्य काळात राज्यसभेत उपस्थित करून”पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करावी” अशी आग्रही मागणी केल्या मुळे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख यांनी नीरज डांगी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
संपूर्ण देशभरातील अधिस्वीकृती धारक पत्रकार व त्यांच्या पत्नीस कोविड पुर्वी रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत होती.. श्रमिक पत्रकार, ग्रामीण पत्रकारांना या सवलतीचा चांगला फायदा होतं होता. दुर्दैवानं भाजप सरकारनं पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती कोविड काळात बंद केल्या मात्र पत्रकारांबद्दल विद्यमान सरकारच्या मनात सूप्त अढी असल्याने पत्रकारांची प्रवास सवलत अजून सुरू झालेली नाही..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने या मागणीचा रेल्वे मंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला आहे. रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनाही मराठी पत्रकार परिषदेचं शिष्टमंडळ भेटले होते. खासदारांना देखील पत्रव्यवहार करून लोकसभेत, राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार यापुर्वी पप्पू यादव, दुराई वैको, वद्दीराजू रवींचंदर्, अमर काळे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केलेला आहे.. आज पुन्हा नीरज डांगी यांनी पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. संतापाची गोष्ट अशी की, रेल्वे मंत्र्यांनी यावर ठोस कोणतेच आश्वासन दिलं नाही..
नीरज डांगी यांनी तात्काळ प्रभावाने रेल्वे सवलत लागू करावी, त्यासाठी स्पष्ट, पारदर्शक आणि कायमस्वरूपी धोरण तयार करावे अशी मागणी केली..
ते म्हणाले, “पत्रकारोंको यात्रा रियायतो से वंचित रखना अप्रत्यक्ष रूपसे उनकी कार्यक्षमता को सीमित करता है!”
भाजप सरकार मालक धार्जिणे आहे..
सरकारनं देशातील 25 धनदांडग्या माध्यम मालकांना विविध मार्गानं उपकृत करून ठेवलेलं आहे किंवा त्यांनी इडी, सीबीआयची भिती दाखवत भारतीय माध्यमाचं रूपांतर गोदी मिडियात करून टाकलं आहे. त्यामुळे श्रमिक पत्रकारांना काही सवलती द्याव्यात किमान ज्या सवलती होत्या, त्या पुर्ववत पुन्हा सुरू कराव्यात याची सरकारला गरज वाटत नाही. रेल्वेमंत्री या विषयावर त्यामुळेच तोंड उघडत नाहीत. तरीही या पुढे आम्ही सातत्याने पाठपुरावा करीतच राहू असे मत
मा. एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.



