Wednesday, February 11, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*अंबाजोगाईत कला दर्पण महोत्सव जल्लोषात साजरा* *आनंदी राहण्यासाठी अंगामध्ये कला असणे आवश्यक – डॉ.राजेश इंगोले* *डॉ.राजेश इंगोले हे अष्टपैलू व्यक्तिमत्व – राजकिशोर मोदी*

*अंबाजोगाईत कला दर्पण महोत्सव जल्लोषात साजरा*

*आनंदी राहण्यासाठी अंगामध्ये कला असणे आवश्यक – डॉ.राजेश इंगोले*

*डॉ.राजेश इंगोले हे अष्टपैलू व्यक्तिमत्व – राजकिशोर मोदी*

*कला दर्पण महोत्सवाच्या माध्यमातून डॉ.इंगोले यांनी डॉक्टरांना सशक्त सांस्कृतिक मंच दिला – राज्याध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी*


======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कला दर्पण २०२५-२६ मधील राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम अंबाजोगाई येथील परिचय हॉल येथे नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष डॉ.राजेश इंगोले हे होते. तर उद्घाटक म्हणून अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी या संस्कृतिक मंचावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.अरविंद बगाटे, नेतृत्व विभागाचे प्रमुख ज्ञानोबा दराडे, समितीच्या उपाध्यक्ष डॉ.पल्लवी दोडके, महाराष्ट्राच्या सहसचिव गितांजली शर्मा, स्थानिक शाखेचे उपाध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव डॉ.उद्धव शिंदे, कोषाध्यक्ष डॉ.बळीराम मुंडे,‌ महिला विभाग अध्यक्ष डॉ.मनीषा राठोड यांंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागत समारंभाने झाली. आपल्या उद्घाटकीय भाषणात बोलताना राजकिशोर मोदी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचा हा कला दर्पण कला महोत्सव अंबाजोगाई येथे होत आहे. या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे. त्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांचे मी आभार व्यक्त करतो. आयएमएच्या कला दर्पण महोत्सवामुळे महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांतून पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या अंबाजोगाई मध्ये सर्व डॉक्टर्स कलाकार मंडळी आली. त्यांचा हा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ सोहळा येथे आयोजित करणाऱ्या सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष असणारे आमचे सहकारी डॉ.राजेश इंगोले यांनी हा योग घडवून आणला त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर हा सुद्धा एक माणूस असतो. त्यालाही त्याचे जीवन असते. त्याच्या मध्येही एक कलाकार लपलेला असतो. परंतु, या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना त्याला नाईलाजाने आपल्या सुप्त गुणांना दाबून ठेवावे लागते. याचं कारण म्हणजे डॉक्टरांसाठी असा वेगळा सांस्कृतिक कला महोत्सव नव्हता. परंतु, डॉ.राजेश इंगोले यांनी दूरदृष्टीपणाने गेल्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण रितीने इंडियन मेडिकल असोसिएशनचा कला दर्पण हा सशक्त सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्संना उपलब्ध करून दिला आणि त्याचे फळ म्हणून आज एवढ्या प्रचंड संख्येने महाराष्ट्रातील डॉक्टर्स मंडळी आपल्या विविध कला येथे सादर करीत आहेत. आणि आपल्या जीवनाचा आनंद घेत आहेत. मला वाटतं एखाद्या कार्यक्रमाचे यश हे त्या माणसाने केलेल्या मेहनतीचे फळ असतं आणि डॉ.इंगोले हे त्यांना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग संपूर्ण ताकदीने करतात. याचा अनुभव अंबाजोगाईकरांनी ते शिक्षण सभापती असताना घेतलेला आहे. परंतु, महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्संनी आता अनुभव घेतलेला आहे. अत्यंत प्रभावी आणि नियोजनबद्धरित्या हा कार्यक्रम त्यांनी अंबाजोगाई येथे घडवून आणला व डॉक्टरांच्या सुप्त गुणांना हे सशक्त सांस्कृतिक कला मंच उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक महाराष्ट्रभरातील डॉक्टर बांधव करीत आहेत आणि अंबाजोगाई चे नांव महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात पोहचविण्याचे काम डॉ.इंगोले यांनी केले आहे व ते आमचे सहकारी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार राजकिशोर मोदी यांनी यावेळी काढले. माजी अध्यक्ष डॉ‌.रवींद्र कुंटे यांनी बोलताना डॉ‌.राजेश इंगोले यांच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहून माझ्या काळात सर्वप्रथम मी त्यांना सांस्कृतिक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली. त्याच वर्षी त्यांनी चिपळूण येथे अत्यंत दर्जेदार व बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणला त्याच वेळी आम्हाला कळलं की, या पदासाठी आम्ही योग्य व्यक्ती योग्य वेळी निवडला आहे आणि आज आपण त्याचे फलित पाहत आहोत. की, महाराष्ट्र मधून डॉक्टर्स या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक स्पर्धांची वाट पाहत आहेत आणि प्रचंड संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत मला वाटतं एखादा माणूस एखाद्या पदाला वलय कसं प्राप्त करून देतो व त्या पदाचा उपयोग त्या संघटनेत काम करीत असणाऱ्या माणसांसाठी कसा करून देतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष डॉ.राजेश इंगोले हे आहेत. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी गेल्या तीन वर्षांपासून डॉ.राजेश इंगोले हे सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि या तिन्ही वर्षांमध्ये त्यांचा उत्साह कमी झाला नाही. डॉ.राजेश इंगोले हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. ते ज्या पदावर काम करतात त्या पदाला एक वेगळे महत्त्व प्राप्त करून देतात. याची प्रचिती त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वेगवेगळ्या पदांवर काम करताना दाखवून दिली आहे. एखाद्या व्यक्ती एखाद्या पदाला किती मोठे करू शकतो याचे उदाहरण म्हणजे डॉ.राजेश इंगोले आहेत. त्यांच्या कार्यकाळांमध्ये दवाखाने आणि रूग्ण यामध्ये व्यस्त असलेला डॉक्टर आणि या डॉक्टर मधील कलाकार शोधून काढण्याचे काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रभरातील डॉक्टरांना त्यांनी एक मजबूत असं सांस्कृतिक कला मंच उपलब्ध करून दिला आणि ज्या सांस्कृतिक समितीवर काम करायला कोणी तयार नसायचं त्या सांस्कृतिक समितीला यशाच्या शिखरावर नेण्याचे काम डॉ.इंगोले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये करून दाखवला आहे. या अशा हरहुन्नरी आणि उद्या नेतृत्वाची संघटनेला भविष्यामध्ये ही गरज आहे. आणि त्यांच्या या कार्याच्या पाठीशी आम्ही त्यांचे सहकारी म्हणून राज्य पदाधिकारी म्हणून कायम उभे असतो याची ग्वाही त्यांनी दिली. अंबाजोगाई येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचा हा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत दर्जेदार होत आहे व त्याला आता व्यापक स्वरूप आलेले आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, डहाणू, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, धुळे, वर्धा या ठिकाणाहून हे विजेते स्पर्धक डॉक्टर्स या ठिकाणी आले आहेत आणि या सांस्कृतिक पारितोषिक वितरण समारंभाचे हे मिळालेले प्रचंड मोठे यश आहे असे मी मानतो आणि त्याचे सर्व श्रेय समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले व त्यांच्या टीमला जातं या शब्दांत त्यांनी डॉ.इंगोले यांची प्रशंसा केली. आपल्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, मी कोणत्याच पदाला छोटं किंवा मोठं मानत नाही. ते पद स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पदाद्वारे संघटनेसाठी काय करता येईल या गोष्टींचा प्राधान्याने विचार करतो. त्यानंतर त्या पदाचा उपयोग करून सर्वसामान्यांसाठी विविध कार्यक्रम प्रोजेक्ट व नवीन संकल्पना तयार करतो. त्यासाठी लागणारी टीम मी उभी करतो. त्या टीम मधील विविध पैलू असलेले सदस्य कशा पद्धतीने त्या प्रोजेक्टसाठी दर्जेदार काम करू शकतील याचा विचार करतो आणि मग प्रत्येकाला त्याची योग्य ती जबाबदारी वाटून देतो. त्यामुळे ते पद अल्पवधीतच नांवारूपाला येतं. सांस्कृतिक समितीचे अध्यक्षपद स्वीकारत असताना ही ते पद कोणीच घेत नाही. याची मला पुर्वकल्पना होती. परंतु, मी ते पद स्वीकारलं. माझ्या सहकाऱ्यांच्या साह्याने विविध कार्यक्रम आयोजित केले आणि दरवर्षी त्याला उत्तरोत्तर माझ्या डॉक्टर्स कलाकार मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळत गेला. डॉक्टरांत दडलेला कलाकार माझ्या या कामामुळे बाहेर आला याचे मला अधिक समाधान आहे. आयुष्य जगत असताना पैसा हे ध्येय असावं. कारण, ते जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु, त्या जीवनामध्ये आनंद समाधान आणि त्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ते जीवन जगताही आलं पाहिजे आणि जीवन जगण्यासाठी आपल्या अंगात असणाऱ्या सुप्त गुणांना कलागुणांना वेळोवेळी प्रदर्शित करता आलं पाहिजे, प्रकट करता आलं पाहिजे आणि आपलं जीवन समृद्ध करता आलं पाहिजे. अनेक जणांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना डॉ.राजेश इंगोले यांनी अत्यंत मोलाचं काम केलं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु, हे यश इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक समितीचा राज्याध्यक्ष म्हणून जरी मला मिळत असलं तरी त्यामागे मागील तीन वर्षांपासून माझ्यासोबत खंबीरपणाने असणाऱ्या राज्य समिती सदस्य डॉ.पल्लवी दोडके, डॉ.मोहिनी गानू, डॉ.गितांजली शर्मा, डॉ.तुकाराम मुंढे, डॉ.राजश्री सावंत, डॉ.वृंदा कुलकर्णी, डॉ.प्रज्ञा किनगावकर, डॉ.योगेश मुळे, डॉ.श्रुती जाधव, डॉ.विनोद शेलार, डॉ.प्रफुल्ल जटाळे, डॉ.अमोल गित्ते तसेच स्थानिक शाखेचे डॉ.विजय लाड डॉ.उद्धव शिंदे, डॉ‌.बळीराम मुंडे, डॉ.नितीन पोतदार, डॉ.दीपक कटारे, डॉ.निलेश तोष्णीवाल, डॉ.मनिषा पवार, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.स्वप्नाली सुवर्णकार, डॉ.सारिका शिंदे, डॉ‌.प्रल्हाद गुरव, डॉ.शाहिद शेख, डॉ.इम्रान पटेल, डॉ.स्नेहल होळंबे डॉ.संगीता चव्हाण, डॉ.दिनकर राऊत, डॉ.जिगीशा मारवाळ, डॉ.विवेक मुळे, डॉ.अमोल दहिफळे यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला अशी कृतज्ञता डॉ.इंगोले यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती व्यक्त केली. यावेळी अधिष्ठाता डॉ.अरविंद बगाटे, विभागप्रमुख डॉ.ज्ञानोबा दराडे, उपाध्यक्ष डॉ.पल्लवी दोडके यांनी आपले समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका प्रा.सुरेखा सिरसाट खंडाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.अरूणा केंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमास नगरपरिषद गटनेते ताहेरभाई सय्यद, सभापती नजीरभाई पठाण, नगरसेवक राजपाल जावळेंसह इतर नगरसेवक, पत्रकार, रोट्रॅक्ट क्लबच्या रोहिणी पाठक, महात्मा फुले स्मारक समिती सदस्य, इनरव्हिल क्लब, रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य, सर्व डॉक्टर्स व अंबाजोगाईतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

======================

======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!