Skip to content
राडी येथे चोरट्यांनी केल्या दोन घरफोड्या सोन्याच्या दागिन्यासह साधारण 35 लाख रुपयाचा ऐवज नेला लुटून

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील राडी या ठिकाणी काल रात्री चोरट्यांनी केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यासह 35 लाख रुपयाचा ऐवज लुटून नेला असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील राडी या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी गावच्या मध्य भागी राहात असलेल्या बालासाहेब विष्णू गंगणे व सेवा निवृत मुख्याध्यापक दत्तात्रय राजाराम गंगणे यांच्या घरा सह आजूबाजूच्या घरास बाहेरून काढायला लावून आत मध्ये प्रवेश केला व बालासाहेब गंगणे यांच्या घरातील जवळपास 20 तोळे सोन्याचे दागिने तर दत्तात्रय गंगणे यांच्या घरातील चार तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचा दावा बालासाहेब व दत्तात्रय गगणे हे करत आहेत
या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले व पोलीस उपनिरीक्षक जगताप यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, फिंगर व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. लवकरच घटना स्थळी अपर पोलीस अधीक्षक असं स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल होणार असून
या संदर्भात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून गुन्हा दाखल झाल्यानंतरच प्रत्यक्षात किती ऐवज चोरीस गेला याची माहिती प्राप्त होणार आहे.
Post Views: 506
error: Content is protected !!