Wednesday, February 4, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आयोजित नर्सिंग लीडरशिप अँड मॅनेजमेंट या विषयावरील  निरंतर परिचर्या शिक्षण कार्यक्रमास परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आयोजित नर्सिंग लीडरशिप अँड मॅनेजमेंट या विषयावरील  निरंतर परिचर्या शिक्षण कार्यक्रमास परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 अंबाजोगाई (प्रतिनिधी )

    येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अंबाजोगाई यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या नर्सिंग लीडरशिप अँड मॅनेजमेंट या विषयावर निरंतर परिचर्या शिक्षण कार्यक्रमास परिचारिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.

    27 जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी राज्य सरचिटणीस श्रीमती सुमित्रा तोटे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे अधिष्ठाता  डॉ. शंकर धपाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक डॉ. राकेश जाधव, आधीसेविका श्रीमती कल्पना कुडुमतकर मॅडम उपस्थित होत्या.

    या वेळी प्राचार्य श्री महादेव सरवडे सर हे ऑब्झर्वर म्हणून लाभले होते. प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती नाझिया शेख, श्री कृष्णा शिंदे, श्रीमती रोशनी भालेराव, श्री समीर सय्यद, श्री मनोज राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. रजिस्ट्रेशन चे संपूर्ण काम श्री सुहास भिसे, श्री दत्ता गवळी, श्री अजिंक्य सोनटक्के यांनी पार पाडले.

     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती आशा यादव मॅडम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अंबाजोगाई यांनी केले.

    या संपूर्ण प्रोसेस मध्ये सुरुवातीपासून राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे मॅडम, छत्रपती संभाजी नगर शाखेचे श्री.महेंद्र सावळे सर, श्री महेंद्र बनसोडे सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कृष्णा शिंदे (सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अंबाजोगाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!