*पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध; नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला सन्मान*
*पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध; नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला सन्मान*

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा यांचा सन्मान करण्यात आला.
दीर्घकाळापासून पत्रकार भवनासाठी जागेची मागणी प्रलंबित होती. नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून यशवंतराव चव्हाण चौक या ठिकाणी असलेल्या अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलाच्या लगत जागा उपलब्ध करून दिल्याने पत्रकार वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आसुन नंदकिशोर जी मुंदडा यांनी पत्रकारांची गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण केल्या मुळे अंबाजोगाई तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नंदकिशोर जी मुंदडा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय रानभरे, तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर, सचिव वीरेंद्र गुप्ता, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश बोरगावकर, कार्याध्यक्ष पूनमचंद परदेशी, हल्ला विरोधी कृती समिती तालुका निमंत्रक अशोक दळवे, गोविंद खरटमोल, व्यंकटेश जोशी, मोहम्मद फैजान, परमेश्वर वैद्य, प्रा. गोविंद जाधव, प्रशांत मस्के, वसुदेव शिंदे, ज्ञानेश मातेकर,सलीम गवळी, गणेश चांगिरे, शेख मुशीर बाबा, आदीसह या कामी पुढाकार घेणारे वाईस ऑफ मीडियाचे अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व उपस्थित पत्रकारांनी नगराध्यक्षांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुविधांसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचे आणि आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या माध्यमातूनच निधी उपलब्ध करून अंबाजोगाई पत्रकार भवनाची भव्य इमारत या ठिकाणी उभी राहील असा विश्वास यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी व्यक्त केला.
Views: 426


