Skip to content
*डॉ.महंमद इक्बाल प्राथमिक शाळेत खरी कमाई कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन*
——————————————
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
——————————————
अंबाजोगाई शहरातील डॉ.महंमद इक्बाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कष्टाचे व परिश्रमाचे महत्व कोवळया वयात ज्ञात व्हावे यासाठी प्रत्येक शाळेत खरी कमाई या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि त्यातून परिस्थितीवर मात करण्याचे आकलन झाले पाहिजे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्याच अनुषंगाने डॉ.महंमद इकबाल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी वेगवेगळे खाद्य पदार्थ विक्रीसाठी आणले होते. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांनी विक्रीस आणलेल्या खाद्य पदार्थांची खरेदी करुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले आणि सामाजिक स्तरावर असलेल्या खरेदी विक्रीचा अनुभव येण्यासाठी हे महत्वाचे ठरले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन किरमाणी मस्जिद क्रांती नगरचे इमाम मौलाना मुख्तार आणि युवा समाज सेवक फारूक भाई गुत्तेदार यांच्या हस्ते करण्यात आले. खरी कमाई हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय कौशल्य विकसित करणे आणि हलाल उपजीविकेकडे आकर्षित करणे हे आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण होत असतात. शाळेचे मुख्याध्यापक शेख उमर फारूक सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे स्वागत केले. यावेळी डॉ.महंमद इक्बाल माध्यमिक व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मुजाहेद सर, जेष्ठ समाजसेवक अकबर भाई, युवा नेते दौलत मिरखान, समीर खान, अनवर भाई, इम्रान भाई व आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या खरी कमाई कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख शेख राफिया मॅडम, सह प्रमुख अन्सारी सानिया मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Post Views: 206
error: Content is protected !!