परदेशी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बर्दापूर पोलिसांची आरोपी विरुद्ध सुमो टू कार्यवाही
विना परवाना रिवाल्वरने गोळीबार करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी सायगाव येथील ३५ वर्षीय तरुणाला अटक
परदेशी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बर्दापूर पोलिसांची आरोपी विरुद्ध सुमो टू कार्यवाही

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विना परवाना रिवाल्वर बाळगून व गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील एका ३५ वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी परदेशी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुंन पोलिसांनी आरोपी विरुद्ध सुमो टु कार्यवाही केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे २१ जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास
आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याने आपल्या ताब्यात बेकायदेशीर रीत्या विनापरवाना अग्नीशस्त्रे बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केला. शांत असलेल्या सायगाव परिसरात अचानक गोळ्यांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले .
या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश विक्रम तांदळे यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीची आणि घटनास्थळाची झडती घेतली असता त्याच्याकडे ‘Made In USA’ बनावटीची ९ एमएम पिस्टल, ‘Made In Japan’ बनावटीची चांदीच्या रंगाची रिवॉल्वर आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल क्रमांक एमएच २३ आर ०३१७ ही देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम (Arms Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११० अन्वये गन्दा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर आरोपीने ही घातक परदेशी बनावटीची शस्त्रे कोठून आणली आणि गोळीबार करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आसुन सायगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.
Post Views: 347


