*इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राची सांस्कृतिक समितीची राज्य कार्यकारणी जाहीर* *राज्याध्यक्षपदी डॉ.राजेश इंगोले तर उपाध्यक्षपदी डॉ.पल्लवी दोडके यांची नियुक्ती*
*इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राची सांस्कृतिक समितीची राज्य कार्यकारणी जाहीर*
*राज्याध्यक्षपदी डॉ.राजेश इंगोले तर उपाध्यक्षपदी डॉ.पल्लवी दोडके यांची नियुक्ती*

*दमदार कामगिरीमुळे सलग चौथ्या वर्षी डॉ.राजेश इंगोले यांची नियुक्ती ; सर्वस्तरांतून स्वागत*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक समितीच्या राज्य अध्यक्षपदावर अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले तर उपाध्यक्षपदी परभणीच्या डॉ.पल्लवी दोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी सचिव डॉ.विक्रांत देसाई यांनी सदरील निवडीचे पत्र संबंधितांना राज्य मध्यवर्ती कार्यालया तर्फे पाठवले आहे. दमदार कामगिरीमुळे सलग चौथ्या वर्षी डॉ.राजेश इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांची भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना आहे. या संघटने द्वारे डॉक्टरांचे विविध प्रश्न,समस्या यावर डॉक्टरांना मार्गदर्शन करून मदत केली जाते तसेच संघटनेतर्फे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविले जातात. केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारे आरोग्याच्या योजना आखत असताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सूचना निर्देशांचा वापर करून आरोग्याचा मसुदा आखत असते. डॉक्टरांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी ही संघटना अहोरात्र कार्यरत असते सांस्कृतिक समिती ही इंडियन मेडिकल असोसिएशनची महत्त्वाची शाखा आहे. सांस्कृतिक समितीद्वारे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांसाठी दरवर्षी विविध सांस्कृतिक कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात अंबाजोगाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ.इंगोले यांना राज्य कार्यकारिणीने सलग चौथ्या वेळेस सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदाचा मान देत त्यांची नियुक्ती करीत त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. सलग चौथ्या वेळेस राज्य समितीचे कोणत्याही समितीचा अध्यक्ष पदाचा मान पटकाविणारे डॉ.राजेश इंगोले हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इतिहासामध्ये पहिलेच अध्यक्ष डॉक्टर ठरलेले आहेत. डॉ.इंगोले यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत डॉ.राजेश इंगोले यांनी सांस्कृतिक समितीद्वारे महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रील्स सुपरस्टार स्पर्धा, नाट्य स्पर्धा असे विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करीत महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांसाठी एक सशक्त सांस्कृतिक व्यासपीठ तयार करून दिले. त्यांच्या या दमदार अलौकिक कामगिरीमुळे सलग चौथ्या वर्षी डॉ.राजेश इंगोले यांना हे पद देऊन राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी, सचिव डॉ.विक्रांत देसाई, कोषाध्यक्ष डॉ.अमोल गित्ते तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी डॉ.इंगोले हे एक अष्टपैलू व बहारदार व्यक्तिमत्व असून त्यांना जे पद दिले जाते त्या पदाला वलय निर्माण करून देऊन त्या पदाचा उपयोग उत्कृष्ट पद्धतीने कसा करता येईल आणि ते पद कसे संघटनाभिमुख करता येईल यात त्यांचा हातखंडा कुणीच धरू शकत नाही असे गौरवोद्गार काढले.
डॉ राजेश इंगोले यांनी यापूर्वी अंबाजोगाई इंडियन मेडिकल असोसिएशनचे सलग सात वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले, महाराष्ट्राचे सचिव म्हणून ते कार्यरत राहिले, नुकतीच त्यांची राष्ट्रीय मध्यवर्ती कार्यकारणी व नियुक्ती झाली होती त्या पाठोपाठ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीने त्यांच्यावर विश्वास दाखवून सलग चौथ्या वर्षी त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी पदस्थापना दिली आहे.
डॉ.इंगोले यांच्या नियुक्तीमुळे अंबाजोगाई परिसरामध्ये आनंद व्यक्त होत आहे. अंबाजोगाईतील सांस्कृतिक क्रीडा, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांमध्ये डॉ.इंगोले यांचा सहज व महत्वपूर्ण वावर असतो. अंबाजोगाईतील अनेक कार्यक्रमांमध्ये डॉ.राजेश इंगोले यांना प्रमुख पाहुणे आणि व्याख्याता म्हणून ही अनेक शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था आग्रहाने बोलावतात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेक हितचिंतकांनी तसेच मित्र परिवाराने डॉ.इंगोले यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ.इंगोले यांच्या नियुक्तीमुळे अंबाजोगाई शहराचे नांव महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील डॉक्टरांना माहित झाल्याचे, तसेच अंबाजोगाईचा नांवलौकिक सर्व दूर पसरवण्याचे काम डॉ.राजेश इंगोले यांनी केले आहे असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबाजोगाई शाखेच्या सर्व डॉक्टरांनी व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, डॉ.संतोष कदम, डॉ.अनिल पाचणेकर, डॉ.अशोक तांबे, डॉ.शैलेश वैद्य, डॉ.अनुपम टाकळकर, डॉ.उज्ज्वला दहिफळे, डॉ.अशोक कदम, डॉ.अजित केंद्रे, डॉ.आनंद मुळे, डॉ.दिनकर राऊत, डॉ.रमेश भराटे, डॉ.राहुल धाकडे, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.विजय लाड, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.झुबेर शेख, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.गोपाळ पाटील, डॉ.अंबादास गुण्णाल यांनी सदरील नियुक्तीबद्दल डॉ.राजेश इंगोले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
=======================
*
=======================


