*लोकविकास महाआघाडीचे स्टार प्रचारक डॉ.राजेश इंगोले यांचे राजकिशोर मोदींकडून कौतुक*
*लोकविकास महाआघाडीचे स्टार प्रचारक डॉ.राजेश इंगोले यांचे राजकिशोर मोदींकडून कौतुक*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लोकविकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध व्याख्याता, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ.राजेश इंगोले यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत महाआघाडीच्या वतीने जोरदार प्रचार, प्रभावी भाषणे करून अंबाजोगाईकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक लोकविकास महाआघाडीचे सर्वेसर्वा प्रमुख राजकिशोर मोदी व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया यांनी त्यांच्या समाधान रूग्णालयात जावून त्यांचा सत्कार केला. निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मानले आभार.
नुकत्याच झालेल्या अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू असताना अंबाजोगाईतील १५ प्रभागांमध्ये तब्बल ४० कॉर्नर बैठका, सभा घेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणा ने विरोधकांचे मुद्दे, खोटे आरोप खोडत लोकविकास महाआघाडीचे स्टार प्रचारक डॉ.राजेश इंगोले यांनी राजकिशोर मोदी व प्रभागातील इतर नगरसेवकांचा जोशपूर्ण भाषणांद्वारे प्रचार करीत विरोधकांच्या नाकीनऊ आणले होते. ओन्ली डॉ.राजेश इंगोले यांच्या शेरोशायरी आणि आवेशपूर्ण भाषणांनी प्रभागामधील नागरिकांचे मते वळविण्यात ते यशस्वी झाले. डॉ.राजेश इंगोले यांच्या भाषणांमुळे विरोधकांना बॅकफूटवर जावे लागले ही वस्तुस्थिती विरोधक सुद्धा मान्य करीत होते. राजकिशोरज पापा मोदी यांच्या समर्थनार्थ डॉ.इंगोले यांनी आपल्या भाषणांद्वारे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांचा विजय सुकर केला. डॉ.इंगोले यांच्या या कामगिरीची दखल घेत पापा मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अनेक वेळा त्यांचे खाजगीत व जाहीरपणे कौतुक ही केले. कालच्या उपनगराध्यक्षपद निवडीनंतर राजकिशोर मोदी यांनी आठवणीने आपल्या पॅनलचा प्रचार करणाऱ्या या दबंग स्टार प्रचारकाची आवर्जून भेट घेत त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना धन्यवाद दिले. या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांची अनेक जुन्या सहकाऱ्यांनी साथ सोडून दिलेली असताना ही अशा ही परिस्थितीत राजेश इंगोले या शिलेदाराने मोदी यांच्या निवडणुकीची प्रचार धुरा एक हाती सांभाळत अनेक प्रभागांमधून आपल्या मुद्देसूद अभ्यासपूर्ण भाषणाने मतदारांची मने जिंकली. ज्याचा फायदा अनेक प्रभागातील उमेदवारांना झाला असे अनेक उमेदवार खाजगीत बोलून दाखवितात. मुस्लिम बहुल प्रभागात डॉ.राजेश इंगोले यांची भाषणे विशेषत्वाने गाजत असल्याने अनेक उमेदवारांनी डॉ.इंगोले यांची सभा आपल्या प्रभागात व्हावी असा आग्रह पक्ष प्रमुखांकडे केला होता. या निवडणुकीत डॉ.इंगोले हे उमेदवार नसताना ही त्यांनी राजकिशोर मोदी यांच्यासाठी जिवाचे रान करीत प्रचाराची धुरा सांभाळली. त्याची आठवण ठेवत राजकिशोर मोदी यांनी उपनगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आवर्जून डॉ.इंगोले यांची त्यांच्या समाधान रूग्णालय येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचा भव्य पुष्पहार, शाल, श्रीफळ देत विशेष सत्कार करून आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, सचिन जाधव व सुशील जोशी यांची उपस्थिती होती.
=======================
=======================


