Skip to content
योगेश्वरी पॉलीटेक्निक मध्ये “संरक्षण क्षेत्रात नोकरीच्या संधी” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

अंबाजोगाई:- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने ऑटोमोबाईल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “संरक्षण क्षेत्रात नोकरीच्या संधी” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘डी.आरडीओ’चे निवृत्त संचालक तथा गन एक्सपर्ट काशीनाथ देवधर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर हे होते.तसेच कार्यक्रमास संस्थेचे का.उपाध्यक्ष अॅड.जगदीश चौसाळकर ,संचालक पाशु करीम सर,योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
नौदल, भुदल आणि वायू दलाचे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती करण्यात भारत अग्रेसर आहे. त्यामुळे आपण समर्थ व सशक्त सक्षम आहोत हा संदेश जगात पोहोचत आहे, देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र असलेला देश ताकदवान समजला जातो. ज्याकडे अशी ताकद असते, त्याच्या मागे जग उभे राहते. आज आपण ताकदवान ठरत आहोत. जागतिक दर्जाची पाच क्षेपणास्त्र भारताने विकसित केली. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर, आकाश हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्राद्वारे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करता येतो. आज अग्नी-६ आपण विकसित करतो आहोत. ब्रह्योस हे क्षपणास्त्र भारताने रशियाच्या मदतीने विकसित केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीयांची मान जगात उंचावेल संरक्षण क्षेत्रात अशी कामगिरी केली आहे. प्रत्येक भारतीयांना महासत्तेचे स्वप्न दाखवून त्यांनी आत्मविश्वास वाढविला. असे मत डॉ.काशीनाथ देवधर यांनी व्यक्त केले.
AI, Robotics, Mechatronics, आणि Additive Manufacturing यांसारख्या प्रगत क्षेत्रांत काम करून विद्यार्थ्यांनी देशाच्या संरक्षण विभागास अधिक समृद्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव प्राचार्य भीमाशंकर शेटे यांनी केले, तर सूत्रसंचलन प्रा.रोहण देवगावकर व आभार यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. शाम गडदे यांनी मानले. यावेळी ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख प्रा.बप्पासाहेब सोनवणे व प्रा. सचिन हारे ,प्रा.थोरात यांची उपस्थिती होती.
Post Views: 72
error: Content is protected !!