Skip to content
*एम.आय.टी. पुणे संचलित श्री सरस्वती पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एम.आय.टी. पुणे संचलित श्री सरस्वती पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे नुकताच तीन दिवसीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी अॅथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडाक्षमतेबरोबरच संघभावना, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास *अंबाजोगाई शहराचे पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड* हे प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी _*“खेळ आपल्या शिस्तीबरोबरच व्यसन आणि मोबाईलपासून दूर ठेवण्यास मदत करतो”*_ असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. याचप्रसंगी *श्री. संजयकुमार कामखेडकर (सेकंड ऑफिसर, एनसीसी)* हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास अंबाजोगाई शालेय विभागाचे संचालक श्री. संगप्पा तलेवाड, कै. दादाराव कराड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रामराजे कराड यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी माईर्स एम.आय.टी. पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. वि. दा. कराड, अंबाजोगाई शालेय विभागाचे कार्यकारी संचालक श्री. राजेश कराड तसेच सौ. शुभांगी ताई कराड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षकवर्ग, क्रीडा प्रशिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
एकूणच हा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रेरणादायी ठरला.
Post Views: 301
error: Content is protected !!