Skip to content
अनोळखी प्रेताची ओळख पटवून खुनातील आरोपी जेरबंद. दोन दिवसात खुनाचा गुन्हा उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात आढळलेल्या एका अनोळखी प्रेताची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी कामगिरी केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक 18/12/2025 रोजी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळगाव ता. अंबाजोगाई शिवारातील मंचक पंढरी डवारे यांचे गायरान शेतात एक अनोळखी पुरुषाचे प्रेत पालथे स्थितीत आढळून आले. त्यावरून पोलीस स्टेशन बर्दापूर याने सदर घटनेमध्ये पंचनामा करून संबंधीत पुरुषाचे प्रेत शव विच्छेदन करिता सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे नेण्पात आले. शवविच्छेदन झालयानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शवविच्छेदनाचे अहवालावरून सदर मयताचा मृत्यू हा त्याला झालेल्या मारहाणीमुळे झालेला आहे असे निष्पन्न झाले. त्यावरून बर्दापूर पोलीस स्टेशन गुर.नं. 299/2025 कलम 103 (1) भा.न्या.सं. प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला.
वर नमूद गुन्हा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली, घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेण्यात आला.
सखोल चौकशीत मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपीचा माग काढ़त अवघ्या दोन दिवसांत सदर गुन्ह्यात 1) गोरोबा मधूकर डावरे, वय 45 वर्षे, रा. जवळगाव ता. अंबाजोगाई 2) संतोष लिंबाजी मांदळे, वय 34 वर्षे, रा. बाजीरावत चौक, इंडियानगर, लातूर 3) किशोर गोरोबा सोनवणे वय 29 वर्षे, रा. माताजीनगर, कच्चा नाका, बसवेश्वर चौक, लातूर 4) अमोल विनायक चव्हाण वय 26 वर्षे, रा.दुर्गा तांडा ता. कंधार जि. नांदेड ह.मु. एस.टी. कॉर्टर जुना रेणापुर नाका, लातूर या चार आरोपींना दिनांक 20/12/2025 रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्यातील मयत स्वप्रिल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 वर्षे रा. चक्ने गल्ली, रेणापुर ता. रेणापुर जि. लातूर हा मुख्य आरोपी गोरोबा मधूकर डावरे याचे साडूचा मुलगा होता. मुख्य आरोपीचे साडू व त्याचे पत्नीचे निधन झाल्यानंतर स्वप्निल व त्याचा मोठा भाऊ बबलु यांची पालक या नात्याने तो काळजी घेत होता. स्वप्निल याचे लग्न देखील गोरोबा डावरे यानेच करून दिले होते. परंतु लग्नानंतर मयत स्वप्रिल हा नेहमी दारू पिऊन त्याचे पत्नी व गोरोबा यांना सतत त्रास देत होता. तसेच स्वप्रिल हा घरातील वादामध्ये गारोबा याचे अंगावर धावून आला होता. या गोष्टीचा मनात राग धरून गोरोबा याने वरील आरोपींचे मदतीने स्वप्निल पास रेणापुर येथून जवळगाव येथे आणून त्याला जबर मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केला आहे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यात वरील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर कांबळे पो.स्टे. बर्दापूर हे करीत आहेत.
सदरील कामगिरी ही श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंडळे, विकी सुरवसे, चालक पो.ह. अतुल हराळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड व पोलीस स्टेशन बर्दापूर येथील पो. ह. शरद कदम, पी. अं. कडुबा म्हेत्रे यांनी केली आहे.
Post Views: 151
error: Content is protected !!