*विरोधकांच्या दहशतीला न जुमानता सुजाण अंबाजोगाईकरांनी मतदान केले – राजकिशोर मोदी*
*विरोधकांच्या दहशतीला न जुमानता सुजाण अंबाजोगाईकरांनी मतदान केले – राजकिशोर मोदी*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
खरे तर ही अंबाजोगाई नगरपरिषदेची ही निवडणूक विकासाच्या प्रश्नांवर केंद्रित होणे अपेक्षित होते. आम्ही विकासाच्या मुद्दयांवरच मतदारांना आवाहन करीत मते मागीतली. परंतु, आमच्या समोरच्या विरोधकांनी मात्र आमच्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप करून आम्हाला ऐन निवडणूकीत बदनाम करण्याचे काम केले. साम-दाम-दंड हे तंत्र वापरले. तरी परंतु, विरोधकांच्या दहशतीला न जुमानता सुजाण अंबाजोगाईकरांनी मतदान केले असे प्रतिपादन लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी केले. काल झालेली मतदान प्रक्रिया आणि एकूणच निवडणूक काळात त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांसह अंबाजोगाईकरांना जे काही दाहक अनुभव आले. त्याबद्दल मोदी यांनी आपले विचार व्यक्त केले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई नगरपरिषदेची ही निवडणूक विकासाच्या प्रश्नांवर केंद्रित होणे अपेक्षित होते. आम्ही विकासाच्या मुद्दयांवरच मतदारांना आवाहन करीत मते मागीतली. परंतु, आमच्या समोरच्या विरोधकांनी मात्र आमच्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप करून आम्हाला ऐन निवडणूकीत बदनाम करण्याचे काम केले. अंबाजोगाईत ‘आका संस्कृती’ रूजविली, निवडणुकीत साम-दाम-दंड हे तंत्र सुरूवातीपासूनच वापरले. तरी देखील आमच्याकडून विरोधकांबाबत वैयक्तिक टिका, टिप्पणी टाळण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला. सुरूवातीपासुनच विरोधकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आम्हाला टार्गेट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु, त्यांचे ते प्रयत्न असफल झाले. मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी देखील मतदान प्रक्रिया प्रभावीत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावणे, गुन्हे दाखल करण्याची भाषा करणे, मतदान केेंद्राच्या आत जावून मतदारांवर दबाव आणणे, तसेच प्रसंगी मतदान केंद्रात ठाण मांडून बसणे, चुकीचे आरोप करून पोलिस प्रशासनाला दबावाखाली घेत आमच्या कार्यकर्त्यांना धमकावणे, तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना सोशल मिडीयावर चुकीच्या पोस्ट आपल्या जवळच्या, लाभार्थी कार्यकर्त्यांमार्फत टाकायला लावून मतदान प्रक्रिया प्रभावीत करण्याचा खोडसाळवाणा प्रकार विरोधकांकडून करण्यात आला. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील २ हजारांहून अधिक अनोळखी लोक अंबाजोगाई शहरात आणून शहरातील मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न ही केला. असे असले तरी अंबाजोगाईकरांनी कोणत्याही दबाव तंत्राला न जुमानता निर्भयपणे मतदान केले. विरोधकांच्या अशा दहशत निर्माण करणार्या पद्धतीमुळे मतदान प्रक्रिया काही ठिकाणी, काही काळ प्रभावीत झाली. मतदार राजा चलबिचल झाला. यावरून कालपासूनच विरोधकांच्या कार्यशैलीबद्दल अंबाजोगाईकरांतून तीव्र नाराजीचा सुर ऐकावयास मिळत आहे. अंबाजोगाईला बिहार करण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशा पद्धतीची दडपशाही यापुर्वी अंबाजोगाईतील सुज्ञ नागरीक व मतदारांनी कधीही पाहिली नाही. दबाव टाकणे, दाब देणे, पोलिसी यंत्रणांचा वापर करणे, मतदान प्रक्रिया सुरू असताना सोशल मिडीयावरून अफवा पसरविणार्या पोस्ट व्हायरल करणे, असे सर्व हातखंडे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर वापरले. या सर्व प्रकारांमुळे मतदान प्रक्रिया नियोजित वेळेत पार पडण्यास काहीसा विलंब झाला. सुरूवातीपासुनच प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून जुनी प्रभाग रचना मोडीत काढून या प्रभागातले मतदारांचे नांव त्या प्रभागात टाकून अंबाजोगाईतील नागरिकांची मोठी अडचण व ससेहोलपट झाली. हे सर्व विरोधकांनी प्रभाग रचना बदलली त्यामुळेच झाले. याचा त्रास अनेक ज्येष्ठ नागरिक, मतदारांना सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर अनेक मतदारांची नांवे यादीत समाविष्ट न केल्याने त्यांना मतदानापासुन वंचित रहावे लागले. शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथे लोकविकास महाआघाडीचे उमेदवार दिनेश मोतीलाल भराडीया यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करावी अन्यथा मी याच ठिकाणी आत्महत्या करीन असे म्हणत विरोधी उमेदवारांनी पोलिस प्रशासनावर नाहक दबाव आणण्याचा व भराडीया यांना मतदान प्रक्रियेपासुन काही काळ दुर ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. तसेच भराडीया यांच्या भगिनींना ही पोलिस ठाण्यात बसवून ठेवले व नाहक त्रास देण्यात आला. विरोधकांचा हा प्रकार प्रभाग क्रमांक ९ येथील मतदारांना आवडला नाही. त्याचप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये विरोधकांनी अंबाड यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडले आहे. अशी सोशल मिडीयावर चुकीची पोस्ट व्हायरल करून आमची बदनामी व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यातील सत्यता अशी की, अंबाड यांनी त्यांच्या शेतातील धान्य मोंढा बाजारात विक्री करण्यासाठी दिले. आडते यांच्या दुकानी रितसर पावती केलेले पैसे त्यांच्या जवळ होते. अंबाड यांनी कोणालाही पैसे वाटले नाहीत. कारण, ते पैसे त्यांचे स्वतःचे होते. असे असताना ही खोटी माहिती पसरवून विरोधकांनी मतदारांची दिशाभूल केली. हे असे सर्व प्रकार, दबावतंत्र दिवसभर शहरातील विविध प्रभागात सुरू होते. आम्ही या प्रकरणी संयम ठेवला, मतदारांना, गोरगरीब जनतेला कोणताही त्रास होवू नये, सुजाण अंबाजोगाईकरांना भिती मुक्त, शांततेच्या वातावरणात मतदान करता यावे. ही आमची सुरूवातीपासूनच भूमिका होती व आजही आहे ती पुढे ही राहील. असे असताना ही विरोधकांनी नगरपालिका निवडणूकीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ही सत्यता आहे. त्यांचा हा प्रयत्न अंबाजोगाईची सुजाण जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हे आगामी काळात दिसून येईल असा आम्हाला विश्वास आहे.
*अंबाजोगाईतील मतदार बंधु-भगिनींचे जाहिर आभार :*
अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणूकीत सुजाण अंबाजोगाईकरांनी आम्हाला भक्कम साथ दिली, सहकार्य केले, आमच्यावर विश्वास दाखवून आशिर्वाद दिला, आपल्या विश्वासाला मी व लोक विकास महाआघाडीचे सर्व सन्माननीय नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार, कार्यकर्ते कदापि तडा जाऊ देणार नाहीत अशी ग्वाही देतो. आपण दिलेली साथ व सहकार्याबद्दल सुजाण अंबाजोगाईकर सर्वधर्मीय मतदार बंधू आणि भगिनींचे कौतुक, अभिनंदन व जाहीर आभार..!
*~ राजकिशोर मोदी*
(लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार)
=======================
=======================


