उद्या अंबाजोगाईत मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाजाच्या समान न्याय आणि हक्कांसाठी चिंतन परिषदेचे आयोजन*
*उद्या अंबाजोगाईत मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाजाच्या समान न्याय आणि हक्कांसाठी चिंतन परिषदेचे आयोजन*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाजाच्या समान न्याय आणि हक्कांसाठी चिंतन परिषदेचे आयोजन उद्या रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत करण्यात आले आहे. तरी या चिंतन परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबाजोगाई शहरातील स्व.विलासराव देशमुख नगर परिषद सभागृह, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी उद्या रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रो सकाळी ११ वाजता मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाजाच्या समान न्याय आणि हक्कांसाठी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार संजय केनेकर (सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य.) तर यावेळी प्रविणजी जानोरकर (संत गाडगेबाबा यांचे वंशज), सचिनजी साठे (साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे नातू) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.) हे असून याप्रसंगी शशिकांत आमणे (संस्थापक अध्यक्ष, बलुतेदार-अलुतेदार संघ.), जानकीराम पांडे (प्रदेशाध्यक्ष, बेलदार समाज संघटना.) यांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रा.विजय रायमल, परशुराम इंगोले, बालाजी सिंगे, प्रशांत डोरले, दिलीप सोनवणे, डॉ.धर्मराज चव्हाण, विलास जावळे, रामेश्वर शिंदे, विजय पोहनकर, अमृता पवार, शुभम डहाके, अनंत उमाटे, विजय देवडे, भुमन्ना अक्केमवाड, मुकेश शिवगण, सुरेश धोत्रे, कैलास गोसावी, अतुल लोहार, सुदर्शन बोराडे, सुरेश असलेकर, ऍड.किशोर गिरवलकर, कलीम जहांगीर, राजेश पंडित, अक्षय शिंदे आणि इतर मान्यवर समाजनेते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी या चिंतन परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक भीमराव जगन्नाथ दळे (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय बलुतेदार-अलुतेदार विकास परिषद, अंबाजोगाई (जि.बीड), प्रकाश वेदपाठक, संजय तेलंग, सय्यद अमजत भाई, शेख नासिर भाई, महेश वेदपाठक, मधुकर सुरवसे, बबन जंगले, रमाकांत सुवर्णकार, ऍड.सुभाष जाधव, राजेश पुरी, रौफ भाई बागवान, संतोष ताटे, प्रमोद गाडे, सुंदर मारवाळ, ललित पंचभाई, मुनवर भाई बागवान, ज्ञानेश्वर पोतदार आदींसह इतरांनी केले आहे.
*मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाजाला आवाहन :*
मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार बांधवहो, आज आपल्या समाजाला समान न्याय, सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळवून देण्याची वेळ आली आहे. रोहिणी आयोग लागू करा-मायक्रो ओबीसींना न्याय द्या, या न्यायाच्या हक्कांसाठी प्रत्येक समाजघटकाने आपला आवाज बुलंद करण्याची गरज आहे. ही केवळ बैठक नाही.
ही आपल्या अस्तित्वाच्या नव्या दिशेची सुरूवात आहे. तर मग चला, एकजुटीने आवाज उठवूया आणि मायक्रो ओबीसी समाजासाठी न्यायाची नवी पहाट घडवूया. त्यामुळे सर्व समाजबांधवांना या चिंतन परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
=======================
Post Views: 61