Skip to content
अंबाजोगाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्देशाने प्रभाग निहाय आरक्षण – २०२५ ची सोडत जाहीर
कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी कही गम” वातावरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्देशाने प्रभाग निहाय आरक्षण – २०२५ ची सोडत आज मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सोडतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी कही गम” असे वातावरण पहावयास मिळाले.
मागील चार वर्षापासून नगरसेवक पदाची आस लावून बसलेल्या उमेदवाराची नगरसेवक बनण्याची घटिका समिप आली असून शासनाच्या आदेशानुसार आज अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या विलासराव सभागृहामध्ये प्रभाग निहाय आरक्षण 2025 ची सोडत काढण्यात आली. छोट्या मुलींच्या हाताने डब्यामध्ये टाकलेल्या चिठ्ठ्या कडून ही प्रभाग नीहाय सोडत काढण्यात आली.
यावेळी शहरातील पंधरा प्रभागातील इच्छुक उमेदवारासह त्यांचे समर्थक व हौसे नवसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग निहाय सोडतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी कही गम” असे वातावरण पहावयास मिळाले.
काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये प्रभागणी निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे.
प्रभाग – १
अ – सर्वसाधारण (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – २
अ – ओबीसी (खुला), ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – ३
अ – सर्वसाधारण (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – ४
अ – ओबीसी (महिला), ब – सर्वसाधारण (खुला)
प्रभाग – ५
अ – अनुसूचित जाती (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – ६
अ – ओबीसी (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – ७
अ – ओबीसी (खुला), ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – ८
अ – ओबीसी (महिला), ब – सर्वसाधारण (खुला)
प्रभाग – ९
अ – सर्वसाधारण (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – १०
अ – ओबीसी (महिला), ब – सर्वसाधारण (खुला)
प्रभाग – ११
अ – अनुसूचित जाती (महिला), ब- सर्वसाधारण (खुला)
प्रभाग – १२
अ – ओबीसी (खुला), ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – १३
अ – अनुसूचित जाती (खुला), ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग – १४
अ – अनुसूचित जाती (महिला), ब- सर्वसाधारण (खुला)
प्रभाग – १५
अ – अनुसूचित जाती (महिला), ब ओबीसी (महिला), क सर्वसाधारण (खुला)
Post Views: 136
error: Content is protected !!