अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही, आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही, आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
आंबजोगाई (प्रतिनिधी)
हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 40 लाख रु किमतीची 30 टन हळद घेऊन निघालेल्या ट्रक चोरून नेल्या प्रकरणी
अंबाजोगाई ग्रामीणच्या डीबी पथकाने धडाकेबाज कार्यवाही करून आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव परिसरात दिनांक 01/10/2025 रोजी
हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 30 टन हळद ज्याची किंमत 41 लाख 75 हजार 535 रुपये ही घेऊन निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच 26 ए डी 2935 यास
अडवून पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी गाडीचा चालक सय्यद अजगर यास चाकूची भीती घालून मारहाण करून ट्रक चोरून नेला अशा सुरुवातीच्या माहितीवरून व नंतर ट्रकचालक सय्यद अजगर आणि ट्रक मालक नदीम खान यांनीच हे बनावट व खोटा देखावा तयार करून स्वतःच ट्रक मधील हळद चोरून नेऊन त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेले मुद्देमाल चोरीस गेले अशी पोलिसांना व फिर्यादीला खोटी माहिती देऊन फसवणूक केली म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 332/2025 कलम 316 (2), 316 (3), 318 (4), 217, 3 (5) भारतीय न्यास संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्याकडे देण्यात आला.
गुन्ह्यात चोरी गेलेला चाळीस लाखाचा मुद्देमाल व आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश शिंदे यांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना तपास पथक तयार करून तात्काळ मुद्देमाल व आरोपी यास ताब्यात घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले व त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक खोकले यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असद शेख, एएसआय रमेश शिरसाट, पोलीस हवालदार किसन घोळवे यांचे पथक परभणी येथे रवाना केले.
गुन्हे शोध पथक परभणी जिल्ह्यात रवाना होऊन अतिशय शिताफिने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेला चाळीस लाखांच्या मुद्देमालाचा शोध घेऊन 24 तासाच्या आत आरोपी व मुद्देमाल यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे हजर केले.
बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ऋषिकेश शिंदे व पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख असद शेख यांच्या पथकाने आरोपीचा 24 तासांच्या आत शोध घेऊन आरोपींकडून चोरीस गेलेली चाळीस लाखांची 570 पोते हळद ताब्यात घेतल्यामुळे पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर खोकले, तपासी अधिकारी श्री. रंगनाथ जगताप, डीबी पथकाचे श्री. असद शेख, पोलीस उपनिरीक्षक श्री. रहीम चौधरी, एएसआय रमेश शिरसाट, पोहेका किसान घोळवे, बाबुराव घुगे, प्रवीण उळे, बळीराम बासर, कल्याण देशमाने, नारायण गायकवाड, संग्राम सांगवे, शुभम राऊत, धम्मानंद वाव्हळ, रवी चव्हाण, जयदीप कसबे, राहुल भोसले, नवनाथ मुंडे, जसवंत शेप, बाबासाहेब डोंगरे, विवेकानंद सोळंके यांनी गुन्ह्याची उकल होण्यासाठी केलेल्या जलद व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे वरिष्ठांद्वारे सन्मान करण्यात आला.
