Skip to content
राजा उदार झाला स्वतःच्या खिशाला झळ न लावता शेतकऱ्यांच्या मालाच्या जमा झालेल्या करा तुन पूरग्रस्ता साठी 1 लाख द्यायला पुढे सरसावला

अंबाजोगाई प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आव्हाना नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश्वर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयाचा चेक दिला खरा मात्र “राजा उदार झाला स्वतःच्या खिशाला झळ न लावता शेतकऱ्यांच्या मालाच्या जमा झालेल्या करातुन पूरग्रस्ता साठी 1 लाख द्यायला पुढे सरसावला” अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गा मधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली असल्यामुळे सर्वत्र पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे व नागरीकांचे न भरुन निघणारे नुकसान झालेले आहे. त्या अनुषंगाने पूरग्रस्तांना मदत व्हावी या दृष्टीने राज्यभरातून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी विविध पक्ष संघटना व वैयक्तिक स्वरूपात लोक पुढे येताना दिसत असून आपलाही वाटा या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिसावा या उद्देशाने अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेश्वर चव्हाण व त्यांचे सहकारी असलेल्या संचालकांनी पुढाकार घेऊन
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि बाजार समिती मधील आडत्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालावर लावल्या जाणाऱ्या कराच्या रकमेमधून जमा होणारी रक्कम अशी एकूण १,००,०००/- पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेऊन एक लाख रुपये रकमेचा धनादेश सर्व संचालकाच्या उपस्थिती मध्ये दि.०४/१०/२०२५ रोजी माननीय आ.श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला.

सभापती श्री. राजेश्वर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयाचा चेक दिला खरा मात्र “राजा उदार झाला स्वतःच्या खिशाला झळ न लावता शेतकऱ्यांच्या मालाच्या जमा झालेल्या करा तुन पूरग्रस्ता साठी 1 लाख द्यायला पुढे सरसावला” अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गा मधून व्यक्त होत आहे.
Post Views: 244
error: Content is protected !!