Tuesday, October 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

अलखैर पतसंस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजारांची मदत

अलखैर पतसंस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजारांची मदत

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य माणसाला आशेचा किरण दाखवणार्‍या आणि त्यांच्या जीवनात चैतन्य फुलविणार्‍या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक दायित्व स्वीकारुन आज ओला दुष्काळ पसरला आहे. पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी उभा राहिला पाहिजे ही भुमिका घेत अलखैर पतसंस्थेने फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यत निधीसाठी आज उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांच्याकडे सूपूर्द केली.
संपूर्ण मराठवाडयात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या हाताताेंंडला आलेले पिक गेले आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीचे हे आतोनात नुकसान झाले आहे. न भरुन निघणारी हानी झालेली असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे आणि तो पुन्हा स्वाभिमानाने उभा टाकला पाहिजे ही भुमिका अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी घेतली आणि तातडीची बैठक घेवून 51 हजार रुपये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यत निधीसाठी देण्याचे निश्चित केले त्यानुसार आज शुक्रवार दि.3 ऑक्टोबर रोजी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांना धनादेश सूपूर्द केला या प्रसंगी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पतसंस्थेचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारुक, उपाध्यक्ष खतीब मुज़म्मिल, सचिव शेख रिजवान, संचालक शेख मुजाहेद, व्यवस्थापक सय्यद रऊफ, नुर पटेल, बबलु सिद्दीकी,इरशाद भाई, वसीम भाई, सुजादभाई, वाजेद खतीब, हुसैन शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेने राबविलेले या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे कारण ज्याच्यामुळे आपण आहोत त्या शेतकरी बांधवांना वाचविण्याची भुमिका पतसंस्थेने धेतल्यामुळे पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे ऋण व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!