Skip to content
शहरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरनाचा पाया सावित्रीमाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून रचला जात आहे– अध्यक्षा सुनीता मोदी*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शहरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरनाचा पाया रचला जात आहे. दैनंदिन जीवनात महिलांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावत असल्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला. त्या पतसंस्थेच्या सन २०२४-२०२५ सालच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचा आर्थिक अहवाल सादर करत होत्या. यावेळी पतसंस्थेच्या सचिव खडकभावी शोभा बाबू , तसेच उपाध्यक्षा डॉ. धाकडे राजश्री राहुल , मसने उषा गणेश, मस्के अंजली विष्णुपंत , सविता विजय रापतवार , सरवदे संगीता विष्णू, फारोखी परवीन नुजहत , खंडाळे सुरेखा बाबुराव, चोकडा जमुना जयप्रकाश , रुपाली सुधीर धर्मपात्रे, सायली सुहास मोहिते या संचालिकांसह शाखा व्यस्थापक सागर कंगळे हे उपस्थित होते.
पतसंस्थेच्या २०२४-२५ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात अंबाजोगाई वासीयांचे आराध्यदैवत श्री योगेश्वरी देवी तसेच सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक सागर कंगळे यांनी संस्थेच्या मागील वर्षाचा इतिवृत्त सादर केला. ज्यामध्ये संस्थेच्या आर्थिक वर्षातील विविध विषयांवर चर्चा घेवून त्यांना मान्यता मिळवली. तसेच मा अध्यक्षांच्या अनुमतीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
पतसंस्थेचा वार्षिक अहवाल अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी सादर केला . आपल्या देशाची संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे . यामुळे समाजात बहुतांश वेळी महिलांना दुय्यम स्थान देताना दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून बहुतांश महिला घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेली आढळून येत असते. कुटुंबात तसेच दैनंदिन व्यवहारात महिलांना आर्थिक स्वायत्तता नसते. हीच बाब हेरून साधारणपणे १० वर्षा पूर्वी राजकिशोर मोदी व सौ सुनीता मोदी यांनी केवळ महिलांनी महिलांसाठीच चालवावी अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या पतसंस्थेमुळे महिलांना काही प्रमाणात का होईना आर्थिक स्वायत्तता मिळून त्यांचा व कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच अध्यक्षा सुनीता मोदी यांनी सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेच्या माध्यमातून शहरातील आर्थिक सशक्तीकरनाचा पाया रचला गेला आहे असा आनंद सुनीता मोदी यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी व्यक्त केला. या सभेदरम्यान पतसंस्थेच्या उत्कृष्ट ग्राहक महिलांचा सन्मान व सत्कार पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालिका यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती विशद करताना त्यांनी ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ही २३१५ एवढी असल्याचे सांगितले . तसेच संस्थेचे भागभांडवल हे रुपये २५ लाख एवढे जमा असल्याचे नमूद केले .३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेकडे ५ कोटी च्या ठेवी जमा झाल्या असून त्यामधून समाजातील गरजवंत महिलांना ३ कोटी रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई पिपल्स बँकेत सावित्रीमाई फुले पतसंस्थेने ०३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे . त्याच बरोबर ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेस ०३ लाखाचा नफा झाल्याचे देखील अध्यक्षा सौ. सुनीता मोदी यांनी सांगताना झालेल्या नफ्यातूनच पतसंस्थेच्या सर्व सभासदांना ७% लाभांश देण्याचे याप्रसंगी जाहीर केले.
पतसंस्था करत असलेल्या आर्थिक उन्नती चे सर्वस्वी श्रेय हे पतसंस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालिका, ठेवीदार ,सभासद आणि महिलांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर परतावा यालाच द्यावे लागेल असेही सौ.मोदी म्हणाल्या. आजमितीला संस्थेत सागर कंगळे शाखा व्यवस्थापक , सचिन काशीद व अनिल काळे हे ०३ कर्मचारी तसेच ०१ नित्य निधी ठेव प्रतिनिधी असून ते देखील संस्थेच्या कामात मोलाचा वाटा उचलत असल्याचे अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेतील उपस्थित सर्व संचालिका, सभासद,व खातेदारांचे आभार उपाध्यक्षा खंडाळे सुरेखा यांनी व्यक्त केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेचे अनेक सभासद , ग्राहक तथा हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Post Views: 272
error: Content is protected !!