Skip to content

स्वा रा ती रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या पायाहून बसचे चाक गेले आणि जीवाला मुकली
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्वा रा ती रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या पायाहून बसचे चाक गेल्या ने तिला जीवाला मुकावे लागल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील लातूर टी पॉईंट वर घडली.
प्राप्त माहिती नुसार एम एच 14 एम एच 2347 या क्रमांकांची धारूर आगाराची बस धारूर हुन परळी कडे निघाली होती. या बस मध्ये केज येथून दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कार्यरत 57 वर्षीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी विजयमाला सरवदे या रुग्णालयात जाण्यासाठी बस मधून उतरत असताना तिचा साडीचा पदर अडकला आणि ती खाली पडली आणि काही कळण्या अगोदर बस सूरू होऊन तिच्या दोन्ही पायावरून गेली.

तिला जखमी अवस्थेत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारा साठी नेले असता उपचारा पूर्वीच तिची प्रानज्योत मालवली. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आसुन स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शोककळा पसरली आहे.
Post Views: 575
error: Content is protected !!