पोटाची खळगी भरण्यासाठी आई बापा सोबत आलेल्या चार वर्षी चिमुकलीवर परळीत नराधमाने केला बलात्कार परळी रेल्वे स्टेशनवर आज दुपारची घटना
पोटाची खळगी भरण्यासाठी आई बापा सोबत आलेल्या चार वर्षी चिमुकलीवर परळीत नराधमाने केला बलात्कार
परळी रेल्वे स्टेशनवर आज दुपारची घटना
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पोटाची खळगी भरण्यासाठी पंढरपूरहुन परळीत आपल्या आई बापासोबत आलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याची घटना आज दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात घडली.
या चिमुकलीचे आई-वडील आजच पंढरपूर वरून रेल्वेने परळी शहरात आले आणि रेल्वे स्टेशन परिसरात ते झोपले असता त्याच वेळी त्यांची चिमुकली या परिसरात खेळत असताना या परिसरात फिरणाऱ्या एका अज्ञात नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.
यावेळी ती चिमुकली रडत परत आपल्या आई-वडिलाकडे आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले.
चिमुकलीची परिस्थिती पाहून तिला तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून परळी वैजनाथ येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहे
