Skip to content
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षात मृतदेह

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका कडून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालया कडे जाणाऱ्या रोडवरील मुंडे पीर स्मशानभूमीच्या समोरील बाजूस एका छोटा हत्ती रिक्षा मध्ये सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार हा ऑटो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरात अतिक्रमण करून ठाण मांडून बसलेल्या एका हॉटेल व्यवसायिकाचा असुन यात पाण्याची टाकी ठेऊन पाण्याचा व्यवसाय केला जात होता. गेली तीन दिवसा पासून हा मृतदेह त्या छोटाहत्ती ऑटो रिक्षाच्या कॅबिन मध्ये असण्याची शक्यता असून काल दुपारी ऑटोचा चालक जवळ येताच त्यातून दुर्घधी आल्याने त्याने ऑटोची कॅबिन उघडून पाहिली असता आत मध्ये संदीप भगवानदास कोन्हाळे रा बोरुल ता जी लातूर ( वय 34 ) या मद्य प्राशन करुन रुग्णालय परिसरात फिरणाऱ्या याचा मृतदेह दिसला.
या मृतदेहाची दुर्गंधी एवढी होती की रिक्षाच्या जवळ फिरण्याकण्यास कोणीही धजावत नव्हते मात्र दुरूनच बघ्याची मोठी गर्दी त्या ठिकाणी दिसून येत होती घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे पो हे कॉ भोले यांच्या सह अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह शव विच्छेदन करण्यास पाठवला असून यां प्रकरणी अद्याप पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Post Views: 773
error: Content is protected !!