Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई वकील संघाचे लिपिक सिद्धेश्वर स्वामी यांनी वाढदिवसानिमित्त हार व गुच्छ न स्वीकारता आनंदग्रामला 21 हजार रुपयाची आर्थिक मदत देत दिला आगळावेगळा संदेश 

अंबाजोगाई वकील संघाचे लिपिक सिद्धेश्वर स्वामी यांनी वाढदिवसानिमित्त हार व गुच्छ न स्वीकारता आनंदग्रामला 21 हजार रुपयाची आर्थिक मदत देत दिला आगळावेगळा संदेश 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     अंबाजोगाई वकील संघाच्या कार्यालयातील लिपिक सिद्धेश्वर स्वामी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आवाहन केल्या नुसार शुभेच्छा बरोबरच गुच्छ न स्वीकारता बीड येथील इन्फट इंडियाच्या आनंदग्रामला 21 हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन एक आगळावेगळा संदेश समाजास दिला.

    पाली जि. बीड येथे “”आनंदग्राम” या संस्थेत अनेक अनाथ व एचआयव्ही बाधित विद्यार्थी मुले मुली आसल्याने सिद्धेश्वर स्वामी यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हार,गुच्छ व केक न देता आपल्या फोनपे/गुगल पे नंबर 9421336685 वर जी काही मदत करता येईल ती करावी तसेच वह्या, दप्तर व पेन दिले तरी चालतील, जमा झालेली साहित्य, रक्कम व माझेकडून काही मदत मी आनंदग्राम येथे देणार आहे असे आवाहन केले होते.

    या आवाहना नुसार 19065/- रुपये जमा झाले, त्यामध्ये स्वामी यांनी स्वतःची काही रक्कम टाकून एकूण 21,000/-रुपये आनंदग्राम च्या इन्फट इंडिया बीड या खात्यावर ही मदत पाठवून दिली.

    एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या  व अंबाजोगाई न्यायालय परिसरात सर्वांचा चाहता असलेल्या सिद्धेश्वर शिवलिंग स्वामी यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!