*अंबाजोगाईत येत्या रविवारी दि.२७ जुलै रोजी बालकांची हृदयरोग, 2 डी इको कलर डॉपलर तपासणी व बाल हृदय शस्त्रक्रिया शिबिर* *घुगे हॉस्पिटल,रोटरी क्लब, आयएमए
*अंबाजोगाईत येत्या रविवारी दि.२७ जुलै रोजी बालकांची हृदयरोग, 2 डी इको कलर डॉपलर तपासणी व बाल हृदय शस्त्रक्रिया शिबिर*
*घुगे हॉस्पिटल,रोटरी क्लब, आयएमए अंबाजोगाई,बालाजी हॉस्पिटल व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम*… डॉ घुगे
*अंबाजोगाई /प्रतिनिधी*
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लहान बालकांची हृदयरोग समस्या उद्भवत आहे. आर्थिक क्षमतेमुळे किंवा इतर कारणामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबाला हे महागडे उपचार करता येत नाहीत म्हणून अनेक लहान मुले हे हृदयरोगामुळे त्रस्त आहेत.म्हणून सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या हृदयरोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांच्या घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर सेंटर अंबाजोगाई,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आयएमए अंबाजोगाई, बालाजी हॉस्पिटल मुंबई व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी लहान बालकांचे मोफत हृदयरोग तपासणी, 2- डी इको कलर डॉपलर तपासणी आणि हृदयरोग शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले असून हे शिबिर अंबाजोगाई येथील घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर सेंटर,प्रशांत नगर अंबाजोगाई येथे होणार असल्याची माहिती आयोजक डॉ.नवनाथ घुगे यांनी दिली आहे.
सध्या लहान मुलांमध्ये हृदयरोग समस्या सतावू लागली आहे.लहान बाळ असल्याने ते बोलूही शकत नाही किंवा सांगूही शकत नाही त्यामुळे पालकांचे त्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक क्षमतेमुळे ते महागडे उपचार करता येऊ शकत नाहीत किंवा अधिकची माहिती नसल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक दायित्व निभावणाऱ्या अनेक संस्थांनी पुढे येत यासाठी पुढाकार घेतला आणि ग्रामीण भागातील माणसांना व ग्रामीण भागातील लहान बालके यांना एक नवसंजीवनी मिळावी या सामाजिक दायित्वातून अंबाजोगाई येथील घुगे हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आयएमए अंबाजोगाई, बालाजी हॉस्पिटल मुंबई व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासन यांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहरात लहान बालकांची हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे.या शिबिरात बालकांची प्रथम तपासणी होईल त्यानंतर 2- डी इको कलर डॉपलर तपासणी झाल्यानंतर ज्या बालकांना शस्त्रक्रिये चि आवश्यकता आहे त्याचि शस्त्रक्रिया ही मुंबई येथे बालाजी हॉस्पिटल या ठिकाणी होईल. शस्त्रक्रियेसाठी कसलाही खर्च येणार नाही. लहान बालकासोबत त्यांच्या पालकाचा येण्या- जाण्याचा खर्च राहण्याचा व जेवणाचा खर्च ही वरील संस्था करणार आहे.त्यामुळे पालकांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. मोफत पणे ही हृदयाची शस्त्रक्रिया होणार आहे तरी पालकांनी आपल्या बाळास हृदयरोगासंबंधी काही तक्रार किंवा त्रास असेल तरी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे प्रमुख तथा प्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांच्यासह इतर तज्ञ डॉक्टर या शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. संजय राऊत सर , मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ सर , मा जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे सर , मा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असून ग्रामीण भागासह अंबाजोगाई शहर व परिसरातील माता पालकांनी आपल्या बाळास हृदयरोग आजारासंबंधी काही त्रास असेल तर रविवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक डॉ.नवनाथ घुगे व डॉ उद्धव शिंदे, सर्व आय एम ए पदाधिकारी व सदस्य तसेच रो संतोष मोहिते, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.रोहिणी पाठक, रो. कल्याण काळे, रो धनराज सोळंकी, रो डॉ श्रीनिवास रेड्डी, रो डॉ सचिन पोतदार यांनी केले आहे.
