Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

मुकुंदराज मंदिराच्या कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या टीमने वाचवले प्राण

मुकुंदराज मंदिराच्या कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या टीमने वाचवले प्राण

 अंबाजोगाई 

    अंबाजोगाई शहरातील खडकपुरा येथील रहिवासी असलेल्या राधा नरेश लोमटे या युवतीने मुकुंदराज मंदिराच्या कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सदर घटनेचे वृत्त समजतात घटनास्थळी धावलेले पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या टीमने सदर युवतीस वाचवले असून उपचारार्थ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले आहे. 

     याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई शहरातील खडकपुरा येथील रहिवासी असलेली कुमारी राधा नरेश लोमटे ही युवती आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली आणि थेट शहराच्या उत्तरेस असलेल्या मुकुंदराज मंदिरा कडे गेली. त्या ठिकाणी तिने मुकुंदराज मंदिराच्या कड्यावरून थेट खाली उडी मारली ही घटना पाहणाऱ्यांनी तात्काळ अंबाजोगाई पोलीस अशी संपर्क केला असता अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  पोलीस शरद जोगदंड व त्यांचे सहकारी पो उ नी पवार, कांदे, पो हे वडकर, पो हे मुंडे, पोलीस अंमलदार चादर वाहन चालक जरगर हे  घटनास्थळी धावले आणि तात्काळ सर्वांनी ती ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणी उतरून पाहिले असता ती जिवंत असल्याने तिला वरती आणून तात्काळ उपचारार्थ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले आहे.

     प्राप्त माहितीनुसार मागील एक ते दीड वर्षांपूर्वी सदर युवतीच्या सख्ख्या भावानेच याच मुकुंदराच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

     आत्महत्या करू पाहणाऱ्या राधा लोमटे हिला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तिला शंभर टक्के जीवदान मिळू शकेल असा आत्मविश्वास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी व्यक्त केला असून पोलीस पथकाने केलेल्या धाडसी कार्यवाहीची कौतुक करावे तेवढी कमीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!