अवैद्यरीत्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वर आंबजोगाई शहर पोलिसांची कारवाई
अवैद्यरीत्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वर आंबजोगाई शहर पोलिसांची कारवाई
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड पोलीस अधीक्षकाचा कार्यकाल सांभाळल्या पासून माननीय नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील अवैद्यरीत्या धंदे करणाऱ्यावर पोलिसांची जरब बसली आहे. याच अनुषंगाने आज अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे शहरातील नगरपरिषद समोरील वाईन शॉप मधून श्रीकृष्ण लहूदास साखरे वय 40 वर्ष राहणार चिंचपूर तालुका धारूर व अन्य एक इसम अवैद्यरित्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रंगेहात पकडून त्यांचे कडून देशी व विदेशी दारू सोबत दोन मोटरसायकल अंदाजे किंमत 92 हजार 650 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके, डीवायएसपी अनिल चोरमले, तुमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार हनुमंत चादर भागवत नागरगोजे मनोज वाघ बाळासाहेब पारवे अमोल वाहूळे आदी कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई केली आहे.
