Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई पोलिसांनी तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपीस पकडले एक लाख 39 हजार 790 रूपयाचा ऐवज जप्त 

अंबाजोगाई पोलिसांनी तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपीस पकडले एक लाख 39 हजार 790 रूपयाचा ऐवज जप्त 

 अंबाजोगाई

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या पथकाने पोलीस स्टेशन हद्दीत तिरट जुगार खेळणाऱ्या इसमावर जुगार रेड करण्यात आली असून सहा आरोपी कडून रोख रक्कम, तीन मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 39 हजार 790/- जुगाराचा माल जप्त करण्यात आला आहे.

     माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री नवनीत कावत अप्पर अंबाजोगाई  पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शना खाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस हवालदार मनोज वाघ, पोलीस अंमलदार भागवत नागरगोजे, पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांच्या पथकाने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन हद्दीत काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सदर जागेवर छापा टाकून तिरट खेळणाऱ्या इसमावर आज दिनांक 8/7/2025 रोजी जुगार रेड केली. यामध्ये एकूण सहा आरोपी कडून रोख रक्कम तीन मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण 139790/- जुगाराचा माल जप्त करण्यात आला आहे.

अंबाजोगाई पोलिसांची अवैध गावठी हातभट्टी तयार दारू वाहतुकी विरुद्ध मोठी यशस्वी कारवाई

    अंबाजोगाई पोलिसांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी तयार दारू वाहतुकी विरुद्ध मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.
   गुप्त माहितीच्या आधारे एका घोड्यावरून गावठी दारू वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ अटक करण्यात आली.  सदर आरोपी घोड्यावरून गावोगाव गावठी हातभट्टी तयार दारू पुरवत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे ३० लिटर दारू (६ कॅन) व एक घोडा असा एकूण 89200 रुपयाचा महत्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार वाघ, पोलीस अंमलदार नागरगोजे, आणि पोलीस अंमलदार चादर यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!