दोन दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक जण जखमी, अंबाजोगाई तालुक्यातील घटना
दोन दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक जण जखमी, अंबाजोगाई तालुक्यातील घटना

अंबाजोगाई : (प्रतिनिधी)
दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर हातोला रोडवरील लिंबगाव पाटी आज सायंकाळी घडली असून या अपघातामुळे परिसरात हळ व्यक्त होत आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील अभय सतीश चव्हाण (वय २५) आणि ऋषिकेश अशोक चव्हाण (वय १८) हे दुचाकीवरून बर्दापूर हून हातोला या गावाकडे जात असताना लिंबगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. एम एच 44 एच 31 78 व एम एच 24 बी वाय 95 61 या दोन दुचाकीच्या भीषण अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश चव्हाण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयान उपचार सुरू आहेत.
दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही तरुण हे लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील रहिवासी असून यापैकी एका युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बरदापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अधिक तपास पो उ नि ससाने हे करत आहेत.
