अंबाजोगाई शहर पोलिसांची जुगार अड्डयावर धाड 3 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज जप्त
अंबाजोगाई शहर पोलिसांची जुगार अड्डयावर धाड 3 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज जप्त

अंबाजोगाई
अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या पथकाने मांडवा रोडव वरील शेतामध्ये चोरून चाललेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून तीन लाख 79 हजार रुपयाचा ऐवज जप्त केला असून सात जुगार यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही केली आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की बुधवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरातील मांडवा रोडवर असलेल्या मौलाना दर्ग्याच्या मागील बाजूस एका शेतामध्ये जुगार चालू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना प्राप्त होतात त्यांनी मा. नवनित काँवत पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शना खाली श्री. शरद जोगदंड प्रभारी अधिकारी पोलीस सटेशन अंबाजोगाई शहर, सपोनी कांबळे, पोहे 1671 गायकवाड, पोअं 2020 नागरगोजे, पोअं 890 चादर, पोअं 1954 गित्ते, पोअं 1602 पवार, पोअं 64 गडदे, पोअं 1598 केदार यांनी मौलाना दर्गा अंबाजोगाई बाजुस धनराज थाटकर यांचे विट भट्टीच्या बाजुस जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्या ठिकाणी तिर्रट जुगार खेळ खेळणारे ईसम बिरु ज्ञानोबा हजारे वय 50 वर्षे रा. धनगरगल्ली अंबाजोगाई, जाकियोद्दीन गयासोद्दीन सय्यद वय 57 वर्षे रा. कोठाडगल्ली छल्ला अंबाजोगाई, सोमनाथ बिरु काळे वय 62 वर्षे, रा. धनगरगल्ली अंबाजोगाई, चंद्रकांत श्रीरंग डाके वय 62 वर्षे, रा. कोठाडगल्ली छल्ला अंबाजोगाई, प्रमोद रामभाऊ लोमटे वय 48 वर्षे, रा. काळामारोती अंबाजोगाई वैजनाथ बळीराम पांचाळ वय 50 वर्षे, रा. कावळेश्वर ता. परळी, मोहन नारायण गाडेकर वय 54 वर्षे, रा. धनगरगल्ली अंबाजोगाई यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून नगदी 17090/- रुपये, 05 मोटार सायकल किमंत अदाजे 2,95,000/- रुपये, 06 मोबाईल फोन किमंत अंदाजे 67000/- रुपये असा एकुन 3,79,090/- रुपायाचा जुगार माल जप्त करुन सर्वांना शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले या सर्व ईसमा वर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून रीतसर कार्यवाही केले आहे आला आहे.


