आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वा रा ती रुग्णालयात तीन दिवसीय योगसाधना शिबिर संपन्न
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वा रा ती रुग्णालयात तीन दिवसीय योगसाधना शिबिर संपन्न

अंबाजोगाई
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून तीन दिवसाचे योग साधना शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराची सांगता उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सण 2014 पासून प्रत्येक वर्षी 21 जून रोजी आयुष्य मंत्रालय व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून हे योग दिनाचे 11 वे वर्ष आहे. याच योग दिनाचे औचित्य साधून स्वा रा ती शा वै महाविद्यालय अंबाजोगाई येथे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, स्टाफ नर्सेस व कर्मचारी यांचे साठी तीन दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी नोडल ऑफिसर व योग प्रशिक्षक म्हणून नेत्रविभागप्रमुख व डॉ ज्ञानोबा दराडे यांची निवड महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी केली होती.
डॉ ज्ञानोबा दराडे यांनी 3 दिवसीय योग शिबिरामध्ये विविध प्रकारचे योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रशिक्षण दिले
21 जून रोजी मोठ्या प्रमाणात योग साधना कर्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शंकर धपाटे सर हे होते. डॉ. शंकर धपाटे यांनी स्वतः सुद्धा सर्वाना प्राणायाम व योगाचे महत्व समजून सांगित काही कठीण योगासने सुद्धा करून दाखवले.
योगाचे महत्व सांगताना डॉ धपाटे म्हणाले की, योगासने केल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू, हाडे व सांधे मजबूत होतात तसेच संधिवात सारखे आजारसुद्धा होत नाहीत शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते
प्राणायाम व ध्यान केल्यामुळे श्वसन संस्था याचे कार्य सुधारून हृदय सुद्धा निरोगी राहते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ताण तणाव रोजच वाढत आहेत व अगदी साध्या कारणास्तव मारहाण, आत्महत्या यासारख्या घटना घडत आहे. त्या साठी प्रत्येकाने शारीरिक मानसिक व सामाजिक आरोग्य चांगले राहावे यासाठी रोज 45 मिनिटे योग अभ्यास करावा
या वेळी बोलताना डॉ ज्ञानोबा दराडे म्हणाले की, योग व प्राणायाम केल्यामुळे मन संतुलित राहते , मनाची व मेंदूची कार्य क्षमता वाढते , बुद्धी कुशाग्र होते व एकंदरीत विचारसरणी सकारात्मक बनते.
योग हा सुखी व समृद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग आहे. या वेळी डॉ दराडे यांनी वृक्षासन, ताडासन, भुजंगासन, धनुरासन , त्रिकोनासन शशांकसन, उष्ट्रासन, चक्रासन आदी आदी योगासनांची प्रशिक्षण दिले.
