Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथे सासरच्या जाचास कंटाळून सौ शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेची आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथे सासरच्या जाचास कंटाळून सौ शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेची आत्महत्या

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथे सौ शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने  सासरच्या जाचास कंटाळुन आत्महत्या केल्याचा माहेरच्या मंडळीचा दावा बर्दापूर पोलिसात पाच जनाविरुद्ध गुन्हा  दाखल
     या संदर्भात मुलीचा भाऊ प्रदीप रुस्तम सोळंके यांनी बर्दापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला वडील रुस्तुम लक्ष्मण सोळुंके, आई मनिषा रुस्तुम सोळुंके व एक बहीन शुभांगी असे असुन बहीन शुभांगी हिचे लग्न दि.22/05/2022 रोजी मोहखेड ता धारूर येथे हिंदू रितीरिवाजा प्रमाणे संतोष विलास शिंदे रा. गिता ता. आंबाजोगाई याचे सोबत करुन दिलेले आहे. माझे मेहुणे संतोष शिंदे व त्याचे मित्र संदिप काचगुंडे रा. आसरडोह ता. धारुर या दोघांमध्ये आंबाजोगाई व धारूर येथे ऑप्टीकल्सचे दोन दुकान आहेत. बहीन शुभांगी हीस लग्न झाल्यानंतर तिचे सासरचे लोकांनी एक वर्ष चांगले नांदले. त्यात बहीनीस दीड वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नाव शिवांश असे आहे. त्यानंतर बहीन शुभांगी हिस तिचे सासरचे लोक सासरा-विलास व्यंकट शिंदे, सासु-सुमन विलास शिंदे, नणंद-सिमा विलास शिंदे, संदिप काचगुंडे यांनी माझ्या बहीनीस ऑप्टीकल्सचे तिसरे दुकान टाकण्या करीता एक लाख रूपये द्या अशी मागणी केली. त्यावेळी माझे चुलते विश्वनाथ लक्ष्मण सोळके यांनी एक लाख रुपये दिले. पुन्हा काही दिवसानंतर सासरच्या लोकांनी चुलत्याकडे चार लाख रुपयाची मागणी केली. त्यानंतर माझ्या चुलत्यांनी त्यांना ऑगस्ट 2024 मध्ये माझ्या बहीनीची ननंद सिमा शिंदे हिंचे नेत्रम दुकानावर अंबाजोगाई येथे जावुन दुकानामध्ये पन्नास हजार रुपये व शिवाजी चौक अंबाजोगाई येथे साडेतीन लाख रुपये दिले होते, तिचे सासरचे लोक सासरे, सासु, नणंद, नवरा व संदिप काचगुंडे यांनी पुन्हा-पुन्हा माझ्या चुलत्याकडे पैशाची मागणी करु लागले व माझी बहीन शुभांगी हिस पैशाकरीता सतत मारहाण व शिवीगाळ करून तिचा मानसिक व शारिरीक छळ करु लागले. त्यातच त्यांनी सहा महीन्यापूवीं माझ्या बहीनीस माहेरी मोहखेड येथे आणुन सोडले व त्यांनी पुन्हा आमच्याकडे चार लाख रुपयाची मागणी करून चार लाख रुपये द्या तेव्हा आम्ही तुमच्या बहीनीस नांदवण्याकरीता घेवुन जावू असे म्हणून लागले, व्यावेळी मी, माझे चुलते, माझे वडील इतर नातेवाईक यांनी तिचे सासरचे लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला व बहीनीस नांदवा अशी विनंती केली. त्यांना आमची पैसे देण्याची  ऐपत नाही तुम्ही तिला नांदायला घेवुन जा अशी विनंती केल्यामुळे त्यांनी माझ्या बहीनीस नांदवण्या करीता परत घेवुन गेले, घेवुन गेल्या नंतर सुध्दा बहीनीस सासरच्या  लोकाचा त्रास सुरु होता. पुन्हा तिचे सासरचे लोकांनी मागील तीन महिन्यापुर्वी दुकानात मशिन घेण्याकरीता तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी आम्ही त्यांना आता आमची पैसे देण्याची ऐपत राहीली नाही. याअगोदर आम्ही तुम्हांस मागेल त्यावेळी पैसे दिले आहेत. आता बहीनीला चांगले सांभाळा असे सांगितले होते.
   दि. 05/06/2025 रोजी सकाळी अकरा वाजता मी गावी मोहखेड येथे असताना माझी बहीन शुभांगी हिचे मोबाईल क्र. 8999565805 या नंबर वरून माझे मोबाईलवर फोन आला त्यावेळी माझे मेहणे संतोष शिंदे बोलले व त्यांनी माझी बहीन शुभांगी हिने तिचे सासरी गिता येथे घरात गळफास घेवुन मरण पावली आहे असे कळविल्याने मी, चुलते, आई-वडील व इतर नातेवाईक असे गिता येथे बहीनीचे घरी गेलो. तेथे जावुन पाहीले असता माझी बहीन शुभांगी ही मृत अवस्थेत दिसली. त्यानंतर तेथे पोलीस आले, त्यांनी पंचनामा करून प्रेत पोस्ट मार्टम करीता सरकारी दवाखाना आंबाजोगाई येथे घेवुन गेले. मी व सोबतचे नातेवाईक सुध्दा सरकारी दवाखाना आंबाजोगाई येथे गेलो. माझी बहीन शुभांगी संतोष शिंदे वय 26 वर्ष रा. गिता ता. आंबाजोगाई जि. बीड हिस तिचे सासरचे लोक नवरा – संतोष विलास शिंदे, सासरा-विलास बंकट शिंदे, सासु-सुमन विलास शिंदे, नणंद- सिमा विलास शिंदे सर्व रा. गिता ता. आंबाजोगाई जि. बीड, संदिप काचगुंडे रा. आसरडोह ता. धारुर जि. बीड यांनी संगणमत करुन आमच्याकडे पैशाची मागणी करून बहीनीस सतत मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने शुभांगीने सासरचे लोकांचे त्रासास कंटाळुन तिचे राहते घरी गिता येथे घराचे पत्राचे खाली असलेल्या लोखंडी अँगलला स्कार्पने गळफास घेवुन आत्महत्या केली
      या प्रकरणी प्रदीप रुस्तम सोळंके यांचे फिर्यादी वरून पाच जना विरुद्ध भा द वी  2023 कलम 208,85,115(2),352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून पो उ नी ससाने यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!