ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त.

*लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त.*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचालित पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक
संजयराव विभूते हे आज दि.३१ मे २०२५ शनिवार रोजी आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्ताने विद्यालयात
विभूते यांचा सेवागौरव कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आप्पाराव यादव यांच्या हस्ते विभूते यांचा शाल,पुष्पगुच्छ,भेटवस्तू,आहेर आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी विभूते यांच्या विषयी आपल्या मनोगतातून हृद्य आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती संजयराव विभूते यांनी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होताना एकूण ३४ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा अनुभव सर्वांसमोर मांडत आगामी काळात वेळोवेळी शाळेच्या विविध कामात मदत करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोपात आप्पाराव यादव म्हणाले की, विभूते सरांनी नेहमीच शाळेच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अनेक उपक्रम राबवत आपल्या कार्यशैलीतून वेगळा ठसा उमटवत,मनात कोणताही दुराग्रह न बाळगता सत्यत्याने विद्यालयाच्या प्रगतीचा ध्यास घेतला.सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांना सदैव प्रोत्साहन देत त्यांनी विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी देखील परीश्रम घेतले असे गौरवोद्गार काढले.
सर्वांनी शेवटी विभूते यांना पुढील काळात निरोगी,दीर्घायुष्य लाभावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!