Sunday, June 8, 2025
ताज्या घडामोडी

बसच्या धडकेत अंकुश मोरे या इसमाचा जागीच मृत्यू बस स्थानकात बस आत मध्ये घालताना व बाहेर काढताना चालकास करावी लागते तारेवरची कसरत 

बसच्या धडकेत अंकुश मोरे या इसमाचा जागीच मृत्यू बस स्थानकात बस आत मध्ये घालताना व बाहेर काढताना चालकास करावी लागते तारेवरची कसरत 

अंबाजोगाई प्रतिनिधी

   अंबाजोगाई बसस्थानका मध्ये बस घालत असताना बसच्या दोन्ही चाका खाली येऊन अंकुश मोरे या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना काल सकाळी अंबाजोगाई शहरात घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ होत आसुन बस चालकास बस आत मध्ये नेत असताना आणि बाहेर काढत असताना कमालीची तारेवरची कसरत असल्याचे दिसून येत आहे.
     या विषयी प्राप्त माहिती अशी लातूरहून श्रीगोंदा मार्गे स्वारगेट पुणे कडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच 14 एम एच 1701 ही काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकात प्रवेश करत असताना रस्ता क्रॉस करत असलेला अंकुश मोरे हा साधारण 45 वर्षे वयाचा अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील रहिवासी असलेला इसम बस चालकास न दिसल्याने त्याला बसचा चालकाच्या बाजूने धक्का बसला आणि तो बसच्या टायर खाली आला त्याच्या अंगावरून बसचे पुढील आणि मागील असे दोन्ही तयार केल्याने तो जागीच ठार झाला घटना पाहणाऱ्यांनी त्याला रिक्षामध्ये टाकून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

ऑटो चालक व हातगाडी वाल्या मूळे  एसटी चालकास करावी लागते तारेवरची कसरत 

  अंबाजोगाई शहरात ऑटो रिक्षाची संख्या शहराच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून असून पंधरा-सोळा वर्षाची मुलेही ऑटो चालवुन शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत करत आहेत त्याचबरोबर रस्त्यावर बेशिस्तपणे उभा राहणारे फळ विक्रेत्यांचे गाडी हेही वाहतूक विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरत असून अंबाजोगाई बस स्थानकाच्या बस आत नेण्याच्या आणि बस बाहेर काढण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस ऑटो चालक आणि फळ विक्रेते बेशिस्तपणे उभा असतात यामुळे बस चालकाला बस आत मध्ये नेण्यास आणि बाहेर काढण्यास कमालिची तारेवरची कसरत करावी लागते व पर्यायाने अशा प्रकारचे अपघात वारंवार होताना दिसत आहेत त्यामुळे अशा मजूर ऑटो चालक आणि फळ विक्रेत्या गाडे चालकावर शहर पोलिसांनी वारंवार दंडात्मक कारवाई करून  त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!