पत्रकार संजय सुर्यवंशी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर कार्यवाही करण्याची मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी
पत्रकार संजय सुर्यवंशी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर कार्यवाही करण्याची मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सुर्यवंशी यांना बातमी का छापली म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याचे धमकी देणारे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर कार्यवाही करन्याची मागणी मराठी पत्रकार परिषद मुबंई, सलग्न हल्ला विरोधी कृती समिती च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देशोन्नतीचे पत्रकार व मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी दिनांक 22 मे 2025 रोजी “निवधा तळणी सर्कल मधील 25 गावे 25 तासांपासून अंधारात” या मथळ्या खाली वृत्त प्रकाशित केले. वास्तविक पाहता या बातमीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही तरी सुध्दा कोणाच्यातरी चुकीच्या व्यक्तीच्या गैरसमज करून देण्याच्या प्रकारातून दि. 22/05/2025 रोजी आ बाबुराव कदम यांनी सकाळी 9.25 वाजता 9822210003 या नंबर वरून 7 वेळा तर रात्री 08:44 वा. 9420415921 या नंबर वरून भडव्या, हरामखोरा, मादरचौद चुकीच्या बातम्या छापतोस का असे म्हणत संज्या तुला संपुन टाकेल अशा आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारास जिवे मारण्याची धमकी देवून संपवण्याची भाषा करणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री विश्वस्त मा एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली मराठी पत्रकार परिषद मुबंई सलग्न हल्ला विरोधी कृती समिती अंबाजोगाईच्या पुढाकाराने अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर दत्तात्रय अंबेकर
(जिल्हा निमंत्रक, हल्ला विरोधी कृती समिती), गजानन मुडेगावकर (बीड जिल्हा कार्याध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद), अशोक दळवे (तालुका निमंत्रक हल्ला विरोधी कृती समिती), प्रशांत लाटकर (तालुका अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) (डिजिटल मीडिया परिषदेचे उपाध्यक्ष संजय जोगदंड),यांच्या सह जेष्ठ मार्गदर्शक विरेंद्र गुप्ता, सचिव ज्ञानेश मातेकर, कार्याध्यक्ष पूनमचंद परदेशी, उपाध्यक्ष मारोती जोगदंड, संजय राणभरे, गोविंद खरटमोल, सलीम गवळी, नागनाथ वारद, व्यंकटेश जोशी, वसुदेव शिंदे, गोविंद जाधव, परमेश्वर वैद्य, गणेश चांगिरे, शेख फिरोज, अशोक कोळी, वाजेद शेख आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
