मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्था (CCS बँक) निवडणुकी मध्ये महाराष्ट्र कामगार संघटनेचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हानुमंतराव ताटे यांचा विश्वास
मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्था (CCS बँक) निवडणुकी मध्ये महाराष्ट्र कामगार संघटनेचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील
महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हानुमंतराव ताटे यांचा विश्वास
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्था (CCS बँक) निवडणुकी मध्ये महाराष्ट्र कामगार संघटनेचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हानुमंतराव ताटे यांनी व्यक्त केला.
मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्था (CCS बँक) ही मराठवाड्यातील एस टी कामगारांच्या हिताची एकमेव पतसंस्था असून 1954 साली स्व.भाऊ फाटक यांच्या पुढाकाराने या संस्थेची उभारणी झाली असून कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा संस्था उभारणी मध्ये सिंहाचा वाटा राहिलेला आहे. या संस्थेवर आज तागायत फक्त आणि फक्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे वर्चस्व राहिलेले असून संभाजीनगर येथे या पतसंस्थेचे मुख्यालय आहे. मराठवाड्यात या पतसंस्थेच्या 17 शाखा असून कामगारांच्या विश्वासाच्या ताकतीवर या पतसंस्थेची दरवर्षी 200 कोटी रुपयाची उलाढाल असून यातूनच संस्थेची हजारो कोटीची मालमत्ता उभा राहिलेली आहे. या मध्ये संभाजीनगर येथे भव्य अशी 4 मजली मुख्य कार्यालयाची इमारत असून बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या ठिकाणी स्वतःच्या इमारती आहेत.
या संस्थेचा सभासद असलेला कर्जदार कर्मचारी मयत झाल्यास त्या कर्मचाऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येते. संस्थेच्या वतीने 10 वी , 12 वी, पदवीधर गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा साठी प्रोत्साहन पर आर्थिक सहकार्य करण्यात येते.
अशा या कामगारांच्या कल्याणकारी मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या (CCS बँक) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 20 मे रोजी होतं असून 17 संचालक या मध्ये निवडल्या जाणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र कामगार संघटना पॅनल मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार व संघटनेचे बिड विभागीय सचिव गणेश (बापु) चव्हाण व भटक्या विमुक्त गटातील उमेदवार बिड विभागीय अध्यक्ष दिलीप भाऊ लव्हारे यांच्या प्रचारा निमित्त महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हानुमंतराव ताटे यांनी अंबाजोगाई आगारात प्रचार फेरी काढुन नंतर कामगारांची एक व्यापक बैठक घेतली. या वेळी श्री हनुमंत ताटे यांनी मराठावाडा कर्मचारी सहकारी पतसंस्था (CCS बँक) निवडणुकी मध्ये महाराष्ट्र कामगार संघटनेचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एस टी कामगारांच्या हितासाठी गणेश (बापु) चव्हाण, दिलीप भाऊ लव्हारे यांच्या सह पॅनल मधील सर्व उमेदवारांना विजयी करा असे अवाहन केले.
या वेळी कामगार संघटनेचे सेवावृत्त सभासद,पदाधिकारी, सभासद व मतदार बंधु मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी कामगार संघटनेच्या सर्व संचालकांना निवडून देण्याची ग्वाही हनुमंत ताटे यांना दिली.
