Friday, May 16, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

NEETमध्ये ७२० पैकी ७१० गुण, बीडच्या MBBS विद्यार्थ्यानं पुण्यात गळा चिरून घेऊन आपल जीवन संपवलं. 

NEETमध्ये ७२० पैकी ७१० गुण, बीडच्या MBBS विद्यार्थ्यानं पुण्यात गळा चिरून घेऊन आपल जीवन संपवलं. 

बीड

   बीड मधील २० वर्षांच्या तरुणानं पुण्यात गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून उत्कर्ष महादेव शिंगणे असं विद्यर्थ्याचं नाव असून  भोपाळमधील एम्स कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकनाऱ्या मुळचा बीडचा राहिवासी असलेला उत्कर्ष वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आला असताना त्यानं आत्महत्या केली.

   याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यात ८ मे पासून वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धांमध्ये उत्कर्ष शिंगणे हा सहभागी झाला होता. अभ्यासात हुशार असलेल्या उत्कर्षने शैक्षणिक ताण, अभ्यासाचा दबाव आणि नैराश्य यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येतेय.

उत्कर्षने पुण्यातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आत्महत्या केली. उत्कर्ष गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. आत्महत्या करण्याआधी उत्कर्षने ऑनलाइन चाकू मागवला होता. त्यानं वसतिगृहाती बाथरूममध्ये गळा चिरून आत्महत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

डीजे नाइट एन्जॉयनंतर पहाटे आत्महत्या

आत्महत्या करण्याआधी उत्कर्षने आई-वडिलांना व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट पाठवली होती. व्हॉट्सॲप स्टेटसवरही शेवटचा मेसेज टाकला होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी मित्रांसोबत DJ नाईटमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय भोपाळला जाण्यासाठी तिकीट बुक करण्याची विनंती त्याने मित्राला केली होती. पण भोपाळला जाण्याआधी त्यानं जीवन संपवलं.

सुसाईड नोटमध्ये काय लिहलं?

मी उत्कर्ष शिंगणे, शैक्षणिक तणावामुळे आत्महत्या करत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच, रशियन इतिहास काढून टाका. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे चरित्र अभ्यासात असावे अशी मागणी सुसाइड नोटमध्ये शिक्षण मंत्र्यांकडे केलीय.

नीटमध्ये ७२० पैकी ७१०

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत उत्कर्षने ७२० पैकी ७१० गुण मिळवले होते. अभ्यासात हुशार असणाऱ्या उत्कर्षने इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!