न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची यावर्षीही १००% निकालाची परंपरा कायम
न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची यावर्षीही १००% निकालाची परंपरा कायम
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू व्हिजन पब्लिक सी बी एस ई स्कुलचा इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी CBSE विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी देखील निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत शाळेला १००% निकाल दिला आहे. सलग दहा वर्षां पेक्षा जास्त कालावधी पासून विद्यार्थ्यांनी १००% निकालाची यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. न्यू व्हिजन पब्लिक CBSE स्कुल अंबाजोगाईच्या दहावी व बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. न्यू व्हिजन पब्लिक स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. इयत्ता १२ वी विज्ञान सीबीएसई शाखेत कु. पुनम दत्तात्रय चव्हाण या विद्यार्थिनीने ८९.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. तेजस्विनी चंद्रकांत पांचाळ ८८.२०% द्वितीय तर कु.आकांक्षा केशव तिडके या विद्यार्थिनीने ८१.२० गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
त्याचबरोबर इयत्ता १० वी मधे चि. अभिनव अविनाश मुंडे या विद्यार्थाने ९८.२०% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला तर चि. सार्थक रत्नेश लोहिया ९८.००% द्वितीय, तसेच चि. हर्षल हनुमंत गजबार याने ९७.२०% तृतीय क्रमांक मिळवत संस्थेचे नाव उज्वल केले आहे.
प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी ९० % च्या पुढे २२ विद्यार्थी , ८० पासून ८९ पर्यंत ३१ विद्यार्थी , ७० पासून ७९ पर्यंत ३१ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले . तसेच गणित या विषयात सार्थक लोहिया या विद्यार्थाने १०० पैकी १०० त्याचबरोबर IT या विषयात ४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.
अंबाजोगाई शहरात राजकिशोर मोदी यांनी मागील बावीस वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ओळखून शहरात पहिल्या सी बी एस सी शाळेची स्थापना केली. स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण पुरविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच आज ही संस्था मोठया नावरूपाला आली आहे. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध उच्च पदापर्यंत पोचले आहेत. या शाळेतील सर्व शिक्षक तथा प्राध्यापक वर्ग हा अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असतो.
संस्थेत केवळ शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कलागुण जोपासण्यासाठी संस्थेत शिक्षणासोबतच , क्रीडा साहित्य, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील वेळोवेळी आयोजित केले जातात. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा ओढा या संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर असल्याचे प्रतिवर्षी दिसून येत आहे. न्यू व्हिजन पब्लिक स्कुल अंबाजोगाई शहरातील सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी , कार्यकारी संचालक संकेत मोदी , मार्गदर्शक वसंतराव चव्हाण , डॉ .डी. एच .थोरात , प्राचार्य डॉ. बी आय .खडकभावी , शाळेचे प्राचार्य रेंजू आर चंद्रन , त्याच बरोबर शाळेचे सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तथा कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97%
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शालांत परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला असून यावर्षीही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकालाची यशस्वी परंपरा कायम राखण्यात यश मिळवले आहे. जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात यावर्षी शाळेचा निकाल एकूण 97% लागला असून या निकालामध्ये 23 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह , 21विद्यार्थी प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत 8 तर तृतीय श्रेणीत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान कु नंदिनी योगीराज पांडे हिने 97 टक्के गुण प्राप्त करून पटकावला आहे . शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या गणित , इंग्रजी , विज्ञान या विषयाच्या जादा तासिका, साप्ताहिक, मासिक व सराव परीक्षांचा परिणाम म्हणून या निकालाचे यश विद्यार्थ्यांना संपादन करता आले असल्याचे मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी सांगितले आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या निकालाची यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जोपासत आहे. इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, मार्गदर्शक व्ही .बी.चव्हाण, डॉ. डी एच. थोरात, प्राचार्य बी.आय. खडकभावी तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक विनायक मुंजे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
