Skip to content
भाजपा युवा नेते अक्षय मुंदडांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत 13 मे रोजी चला हवा येऊ द्या, मराठी पाऊल पढते पुढे कार्यक्रमाचे आयोजन
भाजप शहराध्यक्ष संजय गंभीरेंची माहिती

—————————————————————————-
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांचा 13 मे रोजी वाढदिवस असुन त्या निमित्ताने अंबाजोगाई शहरात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये चला हवा येऊ द्या आणि मराठी पाऊल पढते पुढे याचा समावेश असुन शहर तथा पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले. दरम्यान कार्यक्रमाच्या पुर्व तयारीसाठी अक्षय बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक होवुन विविध समित्या वाटप करण्यात आल्या.
हा भव्य कार्यक्रम शहरातील मध्यभागी असलेल्या सेंट अँन्थोनी स्कुलच्या मैदानावर घेतला जात असुन व्यवस्थेतील प्रमुख पदाधिकार्यांनी त्या दृष्टीने मैदानाची काल पहाणी करत रचना केली आहे. युवा नेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस तसं पहाता मोठ्या प्रमाणात साजरा करणे त्यांना स्वत:च मान्य नसते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवल्याचे गंभीरे यांनी सांगितले. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम विनोदी म्हणुन ओळखल्या जातो. ज्यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, सागर करांडे, कुशाल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आदींचा समावेश आहे. मागच्या दहा वर्षापासुन कार्यक्रम खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात जावुन पोहोचलेला असुन तो पहाण्यासाठी लोकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. झी मराठीच्या चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर रसिक कार्यक्रम पहातात. विनोदाची जुगलबंदी, मराठी गाण्यातुन विनोदी विडंबन, वेगवेगळ्या वेशभुषेत कलाकारांची तुफान कॉमेडी याचे आकर्षण रसिकांना असते. थुकरटवाडी हा त्यांचा विशेष कार्यक्रम गाजला असुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात त्यांचे दौरे असतात. दरम्यान याच दिवशी मराठी पाऊल पढते पुढे बहारदार गीतांचा कार्यक्रम देखील होणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाची शहरात जय्यत तयारी सुरू झाली. प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय बंगल्यावर काल पार पडली. त्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा विविध जबाबदार्या त्यासाठी समित्यांची रचना करून प्रमुख पदाधिकार्यांना वाटप करण्यात आल्या. शहरात सेंट अँन्थोनी शाळेचे भव्य मैदान असुन किमान सहा हजार रसिक बसण्याची व्यवस्था अद्ययावत व्यासपीठ असणार आहे. सांस्कृतिक वारसा तथा साहित्य रसिकांचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्या शहरात चला हवा येऊ द्या आणि मराठी पाऊल पढते पुढे दोन भव्य कार्यक्रम होणार असल्याने रसिकांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सद्या तरी कार्यक्रमाची शहरात जोरदार तयारी सुरू असल्याचे लक्षात येते. या मतदारसंघाच्या आ.सौ.नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातुन विकासाची गंगोत्री शहरात आणि मतदारसंघात घेवुन येण्यासाठी शासकिय पातळीवर पाठपुरावा करण्यात स्वत: अक्षय मुंदडांचा सिंहाचा वाटा असुन त्यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासात आमुलाग्र बदल झाल्याचे लक्षात येत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या कानाकोपर्यातील रस्ते दर्जेदार सुमार झाल्याने सर्वत्र लोकांच्या मनातुन मुंदडा कुटुंबियांच्या बाबतीत कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. या कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन संजय गंभीरे यांनी केले.
Post Views: 282
error: Content is protected !!