ताज्या घडामोडी

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी, राज्यात पुन्हा खांदेपालट होऊन पाच IAS अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या.

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी, राज्यात पुन्हा खांदेपालट होऊन पाच IAS अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या

 

मुंबई (प्रतिनिधी )

    राज्य सरकारकडून आयएएस  अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरूच असून आज पुन्हा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बढती देण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

    तर बीड जिल्हाधिकारीपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी असून संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये पोलिस खात्यात अनेक बदल करण्यात आले. बीडच्या एसपी पदावर नवनीत कावत यांना जबाबदारी देण्यात आली होती. तर, बीड शहरातील पोलीस दलातही काही बदल करण्यात आले होते. त्यानंतर, आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी, बीडमध्ये दीप मुधोळ ह्या जिल्हाधिकारी होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता, विवेक जॉन्सन यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.

5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. अभिषेक कृष्णा (आयएएस: आरआर: २००६) सदस्य सचिव, महा. जीवन प्राधिकरण मुंबई यांची संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अविनाश पाठक (आयएएस: एससीएस: २०१३) जिल्हाधिकारी, बीड यांना व्यवस्थापकीय संचालकपदी, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

3. विवेक जॉन्सन (आयएएस: आरआर: २०१८) मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.

4. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: २०१९) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. पुलकित सिंग (आयएएस: आरआर: २०२१) सहाय्यक जिल्हाधिकारी, अंबड उपविभाग, जालना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झेड.पी., चंद्रपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!