पुणे बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे
लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेल व लॉज वर नेवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले व लग्न करण्यास टाळाटाळ केली या आरोपा वरून गुन्हा दाखल असलेल्या फिरोझ शेख रा. पोखरी ता अंबाजोगाई जिल्हा बीड याचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पुणे हद्दीतील राहिवासी असलेली फिर्यादी अमिना (नाव बदलले) हिने आ
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे आरोपी
फिरोझ शेख रा. पोखरी ता अंबाजोगाई जिल्हा बीड याचे विरुद्ध फिर्याद दिली व गुन्हा नोंदवला ज्याचा गु क्रं 1368/2024 हा असून कलम 69 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद झाला आरोपीने या विरोधात पुणे येथील सत्र न्यायालयात धाव घेऊन क्री.बे. अ.१८४/२०२५ हा अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला सरकार पक्षाचा, पोलिसांचा व आरोपीचा युक्तिवाद ऐकून माननीय राठोड मॅडम सत्र न्यायाधीश पुणे या न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला
या प्रकरणात आरोपीतर्फे अॅडवोकेट अशोक विनायकराव कुलकर्णी व अॅड वैजनाथ वांजरखेडे अंबाजोगाई तसेच अॅड विवेक वैद्य पुणे यांनी बाजू मांडली सदर प्रकरणात पोखरी परिसरातील ग्रामस्थांची लक्ष लागले होते.
