Saturday, April 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने बाबासाहेबांच्या अनुयायांना पिण्याचे पाणी व शरबतचे वाटप

राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने बाबासाहेबांच्या अनुयायांना पिण्याचे पाणी व शरबतचे वाटप

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात संपूर्ण देशभर साजरी करण्यात आली. अंबाजोगाई शहरामध्ये देखील बाबासाहेबांच्या अनुयायांनी शहराच्या विविध भागातून जयंती मिरवणूक काढली होती. हजारो अनुयायी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. उन्हाळ्यात गरमीच्या वातावरणामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची पाण्याविना गैरसोय होऊ नये या उद्देशाने राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक व सर्वधर्मीय सलोखा जोपासत डॉ बाबासाहेबांच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या भीम अनुयायांना पिण्याचे थंड पाणी तसेच थंड शरबतचे वाटप करण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरातील सर्व भीम अनुयायी मिळून काढत आले आहेत. यामध्ये हजारो महिला, पुरुष व तरुण युवक तथा युवती मोठया प्रमाणावर सहभागी होताना दिसून येतात. या मिरवणुकीतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व प्रतिमांचे पूजन राजकिशोर मोदी यांच्या वतीने करून बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या सर्व मिरवणुकीच्या अध्यक्षांचा सन्मान फेटा बांधून तसेच शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. अंबाजोगाई शहरातील विविध भागांतील भीम अनुयायी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर मिरवनूकी दरम्यान भीमाचा जयघोष करतांना आढळून आले. अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक भव्य असे व्यासपीठ तयार करून याच व्यासपीठावर जयंती उत्सव समित्यांच्या अध्यक्षांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. महादेव आदमाणे ,राजेंद्र मोरे यांनी यावेळी आपले मनोगत मांडले. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांच्या जीवनाचे अनेक पैलू यावेळी लहान विद्यार्थ्यांसोबतच मोठ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उलगडले. या चिमुकल्या व्यक्त्यांचे विचार ऐकून व्यासपीठावरील अनेक दिग्गज अवाक झाले. त्यांचे मनोगत तथा संभाषण कौशल्य पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचारित्रावर आधारित विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा लवकरच आयोजित करण्याचा मानस राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सामाजिक सलोखा , सर्वधर्म समभाव तसेच सामाजिक उत्तरदायित्व जोपासत भीम अनुयायांना थंड पाणी व थंड शरबत पुरवण्याची संकल्पना राजकिशोर मोदी मित्र मंडळाचे सहकारी तसेच माजी नगरसेवक महादेव आदमाणे यांनी मांडली व या संकल्पनेस तात्काळ संमती सर्वांनी दिली. बाबासाहेबांच्या मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या सर्व कला पथकातिल कलाकारांची कला पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर राजकिशोर मोदी यांच्यासह मनोज लखेरा, महादेव आदमाणे, डॉ राजेश इंगोले,अमोल लोमटे, राजेंद्र मोरे, दिनेश भराडीया, सुधाकर टेकाळे, माणिक वडवनकर , जावेद गवळी,सुनील वाघाळकर, अकबर पठाण, अंकुश हेडे, विजय रापतवार, कैलास कांबळे, शाकेर काझी, खलील जाफरी, महेश कदम, सय्येद अमजद, रफीक गवळी, आकाश कऱ्हाड, अजीम जरगर, विशाल पोटभरे,सुमित आदमाणे, सुमित सुरवसे, सचिन गालफाडे, अस्लम शेख, सुशील जोशी, मुन्ना पठाण, तौसिफ सिद्दीकी, रोहन कुरे, शुभम लखेरा यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!