Saturday, April 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

भाजप कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरला 

भाजप कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हदरला 

माजलगव

   माजलगाव शहरात तरुणाची भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडीओ समाज माध्यमातून समोर आला आहे. बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आसुन तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती हाती आली आहे.

    हत्येनंतर आरोपी स्वतः हा पोलीस ठाण्यात हजर झाला. नारायण शंकर फपाळ असं आरोपीचं नाव आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. आरोपीने बाबासाहेब आगे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी वर्दळीच्या माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

   माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयात आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला

हत्येनंतर नारायण शंकर फफाळने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि हत्येची कबुलीही दिली. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!